-
ऋजुता लुकतुके
फिनटेक युनिकॉर्न कंपन्यांच्या आकडेवारीत भारत आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये देशातील १७ फिनटेक कंपन्या युनिकॉर्न बनल्या. फिनटेक किंवा फायनान्शियल टेक्नोलॉजी पुरवणाऱ्या कंपन्यांना अलीकडे चांगले दिवस आहेत. बँका आणि इतर वित्तीय संस्था देत असलेल्या सर्वप्रकारच्या अर्थविषयक सेवांना तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या या कंपन्या आहेत. आणि अशा फिनटेक युनिकॉर्न कंपन्यांच्या आकडेवारीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३ या साली देशातील फिनटेक युनिकॉर्न कंपन्यांची संख्या १७ झाली आहे. (Fintech Unicorns)
अर्थात, या यादीतील आघाडीचा देश अमेरिकेपेक्षा आपण खूप मागे आहोत. अमेरिका स्टार्टअप कंपन्यांच माहेरघर मानला जातो. आणि इथं २०२३ मध्ये तब्बल १३७ फिनटेक कंपन्या युनिकॉर्न झाल्या. तर युकेमध्ये हा आकडा २७ होता. त्याखालोखाल भारतात १७ फिनटेक कंपन्या युनिकॉर्न झाल्या. (Fintech Unicorns)
(हेही वाचा – Hardik Pandya Injury Update : … तर हार्दिक पांड्या ऐवजी ‘या’ अष्टपैलू खेळाची भारतीय संघात वर्णी)
व्हिसा, पेपाल आणि मास्टरकार्ड या जगातील पहिल्या तीन फिनटेक कंपन्या आहेत. या युनिकॉर्न कंपन्यांच्या एकत्र मूल्यांकनाच्या बाबतीत मात्र अमेरिकेला चीनने तगडी टक्कर दिली आहे. अमेरिकेतील पहिल्या सात फिनटेक युनिकॉर्न कंपन्यांचं एकत्र मूल्यांकनच १.२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं आहे. तर चीनच्या फक्त ८ कंपन्या युनिकॉर्न झाल्यात. पण त्यांचं एकत्र मूल्यांकनही १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या अगदी जवळ आहे. (Fintech Unicorns)
याचं कारण, चीनमधील अँट फायनान्शियल आणि टेन्सेंट या दोन आघाडीच्या कंपन्यांचंच एकत्र मूल्यांकन ३५० अब्ज अमेरिकन डॉलरच्या पुढे आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅली हे आजही स्टार्टअप कंपन्यांसाठी पोषक ठिकाण आहे. मेटा, गुगल, ॲपल आणि ॲमेझॉन सारख्या सगळ्यात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या इथं आहेत. शिवाय स्टार्टअपना सहाय्य करण्यासाठी इथं व्हेंचर कॅपिटल कंपन्यांचं जाळंही चांगलं आहे. भारताबद्दल बोलायचं झालं तर देशातील सगळ्यात मोठ्या युनिकॉर्न कंपन्या ठरल्या आहेत त्या झिरोदा, बिलडेस्क, पेटीएम, रेझरपे आणि पाईन लॅब्ज. युनिकॉर्न म्हणजे ज्या स्टार्टअप कंपनीचं मूल्यांकन १ अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर गेलं आहे अशी कंपनी. (Fintech Unicorns)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community