P V Sindhu Injury Update : सिंधूची गुडघ्याची दुखापत किती गंभीर?

पी व्ही सिंधूला गुरुवारी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या स्ट्रेस फॅक्चरनंतर आता तिचा गुडघा दुखावलाय.

229
P V Sindhu Injury Update : सिंधूची गुडघ्याची दुखापत किती गंभीर?
P V Sindhu Injury Update : सिंधूची गुडघ्याची दुखापत किती गंभीर?
  • ऋजुता लुकतुके

पी व्ही सिंधूला गुरुवारी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या स्ट्रेस फॅक्चरनंतर आता तिचा गुडघा दुखावलाय. पण, ही दुखापत किती गंभीर आहे? (P V Sindhu Injury Update)

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सुपानिदा केटथाँग विरुद्ध खेळताना सिंधूने पहिला गेम जिंकलेला असताना माघार घेतली. २१-१८ आणि १-१ अशी स्थिती असताना आधी सिंधूने वैद्यकीय उपचारांसाठी २ मिनिटं वेळ मागून घेतला आणि त्यातही गुडघ्याची वेदना कमी न झाल्यामुळे सिंधूला अखेर हा सामना सोडावा लागला. (P V Sindhu Injury Update)

सिंधूने पहिल्यांदाच असा सामना सुरू असताना दुखापतीमुळे माघार घेतली आहे. (P V Sindhu Injury Update)

पण, त्यामुळे तिची गुडघ्याची दुखापत नेमकी किती गंभीर आहे असा प्रश्नही निर्माण झाला आहे. ती कधी कोर्टवर परतू शकेल हा दुसरा प्रश्न आहे. (P V Sindhu Injury Update)

आपल्या दुखापतीविषयीचा अपडेट स्वत: सिंधूने एक्स या सोशल मीडियावर दिला आहे. ‘सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय खूपच कठीण होता. मी माझ्या अख्ख्या कारकीर्दीत फारच कमी वेळा सामना सुरू असताना वैद्यकीय उपचारांसाठी ब्रेक घेतला. पण, कालची वेळच वेगळी होती. पहिल्या गेममध्येच डाव्या गुडघ्यात वेदना सुरू झाली. मी तरीही खेळण्याचा निर्णय घेतला. पण, वेदना वाढतच गेली,’ असं सिंधूने आपल्या एक्स खात्यारील संदेशात लिहिलं आहे. (P V Sindhu Injury Update)

(हेही वाचा – Women in Media : मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात उच्चपदांवरील महिलांचं प्रमाण फक्त १३ टक्के)

पुढे काय करणार हे सांगताना सिंधू लिहिते, ‘तेव्हा माघार घेणंच मला योग्य वाटलं. कारण, गुडघ्याला नेमकं काय झालंय हे समजून घेणं महत्त्वाचं होतं. आताही नेमकी दुखापत काय आहे यासाठी वैद्यकीय सल्ला घेण्याला प्राधान्य देणार आहे.’ सिंधूने लिहिलेलं सगळ्यात शेवटचं वाक्यही महत्त्वाचं आहे. ‘याविषयी आताच मला काही विचारू नका. मला सध्या काही माहीत नाही.’ थोडक्यात सिंधूही आता झालेल्या दुखापतीचा अंदाज घेणार आहे. ती किती गंभीर आहे आणि त्यावर काय उपाय करावा लागेल हे ती डॉक्टरांकडून समजून घेणार आहे. त्यानंतरच तिच्या दुखापतीचं स्वरुप समजू शकेल. (P V Sindhu Injury Update)

यावर्षीच्या सुरुवातीला सिंधू स्ट्रेस फ्रॅक्चरवर मात करून कोर्टवर परतली होती. त्यापूर्वी सहा महिने ती दुखापतीशी झगडत होती. त्यामुळे २०२३ च्या हंगामाची सुरुवात चांगली झाली नव्हती. चार स्पर्धांमध्ये उपउपान्त्य फेरीतच तिचा पराभव झाला. जागतिक क्रमवारीतही तिची १३व्या स्थानापर्यंत घसरण झाली होती. त्यानंतर आर्टिक्ट आणि डेन्मार्क ओपनमध्ये सिंधूने उपान्त्य फेरीपर्यंत मजल मारून क्रमवारीतही दहाच्या आत स्थान मिळवलं. पण, इतक्यातच ही नवीन गुडघ्याची दुखापत समोर आली आहे. (P V Sindhu Injury Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.