Stray Dogs In Thane : बाप रे ! ९ महिन्यांत तब्बल ३० हजार २६ जणांचा भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात रहिवाशांकडून जागोजागी रस्त्याकडेला मांस आणि अन्न पदार्थ टाकण्यात येत आहेत. यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

200
Stray Dogs In Thane : नऊ महिन्यांत ३० हजार २६ जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा
Stray Dogs In Thane : नऊ महिन्यांत ३० हजार २६ जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

मागील नऊ महिन्यांत ३० हजार २६ जणांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची नोंद करण्यात आली. (Stray Dogs In Thane) त्यामुळे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागाचे नागरीकरण होत आहे. जागोजागी निर्माण होणाऱ्या घाणीच्या व कचऱ्याच्या साम्राज्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे. (Stray Dogs In Thane)

(हेही वाचा – Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबित; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका)

जानेवारी ते सप्टेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत ३० हजार २६ जणांना कुत्र्यांनी लक्ष्य केले. यामध्ये ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील ६ महिन्यांत १७ हजार ७३७ जणांना कुत्र्याने चावल्याने रुग्ण दाखल झाले आहेत. जानेवारी २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत ठाणे पालिका हद्दीत याच कालावधीत १२ हजार ९८७ जणांचे लचके तोडले असल्याची नोंद करण्यात आली. (Stray Dogs In Thane)

जागोजागी मोठ्या प्रमाणात उभ्या रहाणाऱ्या चायनीजच्या गाड्यांवरील शिल्लक अन्न ते या भटक्या कुत्र्यांना टाकत असतात. तसेच चिकनचे आणि मटनाच्या दुकानांमधून उरलेले मांस हे अनेकदा भटक्या कुत्र्यांना टाकण्यात येते. यामुळे या कुत्र्यांना मांसाची सवय लागते. त्यानंतर एखाद्या वेळेस हे अन्न न मिळाल्यामुळे ही कुत्री पिसाळून रस्त्यावरून ये-जा करणा‍ऱ्यांचा पाठलाग करणे, लोकांच्या अंगावर जाऊन भुंकणे, त्यातून चावा घेणे यांसारख्या घटना घडतांना दिसून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रश्न कठीण होत चालला आहे. (Stray Dogs In Thane)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.