IMC : पूर्वीचं सरकार तेव्हाच्या मोबाईलसारखंच हँग होतं होते ; पंतप्रधान मोदींचा UPA ला टोला

देशाची भावी पिढी देशाच्या टेक इंडस्ट्रीचं नेतृत्त्व करत आहे

140
IMC : पूर्वीचं सरकार तेव्हाच्या मोबाईलसारखंच हँग होतं होते ; पंतप्रधान मोदींचा UPA ला टोला
IMC : पूर्वीचं सरकार तेव्हाच्या मोबाईलसारखंच हँग होतं होते ; पंतप्रधान मोदींचा UPA ला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवार (२७ऑक्टोबर) इंडिया मोबाईल काँग्रेसचे उद्घाटन झाले. यावेळी तंत्रज्ञाना विषयी बोलताना ते म्हणाले की 2014 हे एक महत्त्वाचं वर्ष आहे. तुम्ही 10-12 वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्याकाळचे मोबाईल अगदी आउटडेटेड होते. त्यांच्या स्क्रीन सारख्या हँग होत होत्या. परिस्थिती एवढी वाईट होती, की रिस्टार्ट करुन, बॅटरी चार्ज करुन किंवा बॅटरी बदलून देखील फायदा नव्हता. अशीच परिस्थिती त्याकाळच्या सरकारचीही होती. 2014 नंतर मात्र लोकांनी असे आउटडेटेड फोन वापरणं सोडून दिलं, आणि आम्हाला सेवेची संधी दिली. या बदलामुळे काय फरक पडला हे स्पष्टच आहे. आधी आपण मोबाईलचे सर्वात मोठे इंपोर्टर होतो, मात्र आता आपण मोबाईल एक्सपोर्ट करतोय. तसंच आपण जगातील दुसरे सर्वात मोठे मोबाईल उत्पादक आहोत.” असंही मोदींनी स्पष्ट केलं. (IMC)

पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवार (२७ऑक्टोबर) इंडिया मोबाईल काँग्रेसचे उद्घाटन झाले. यावेळी पुढे बोलताना मोदी म्हणाले की देशात 5G चा वेगाने प्रसार होत असल्याचं म्हणतानाच त्यांनी 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचं नाव घेत, यूपीए सरकारला टोलाही लगावला.पंतप्रधान मोदी म्हणाले, की आमच्या सरकारच्या काळात 4G चा वेगाने विस्तार झाला. तसंच सध्या 5G चा देखील विस्तार होत आहे. 6G तंत्रज्ञानाच्या बाबतीत देखील आम्ही पुढाकार घेतला असून, याबाबत भारत देश जगाचं नेतृत्व करेल. या सगळ्यात आमच्यावर कोणताही डाग आला नाही, हे विशेष नाहीतर, 2G तंत्रज्ञानावेळी काय झालं होतं, हे सर्वांना माहितीच आहे असाही टोला त्यांनी UPA सरकारला लगावला.

(हेही वाचा :Chhatrapati Shivaji Maharaj : प्रजासत्ताक दिनी ३५० किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकविण्याचा संकल्प)

 यावेळी मोदींनी देशातील १०० शिक्षणसंस्थांसाठी ५ जी युजकॅस लॅब देण्याची घोषणा केली.  याप्रसंगी बोलताना मोदींनी म्हटले की, आपण जेव्हा भविष्यावर बोलत असतो, तेव्हा पुढील दशक किंवा शताब्दीबद्दल भाष्य करतो. मात्र, टेक्नॉलॉजी विकासाच्या माध्यमातून आता ह्या गोष्टी काही दिवसांतच पूर्ण होतात. येणारा काळ निश्चितच वेगळा आहे, देशाची भावी पिढी देशाच्या टेक इंडस्ट्रीचं नेतृत्त्व करत आहे असेही ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.