वाघबकरी या चहा कंपनीचे मालक आणि कार्यकारी संचालक पराग देसाई यांना कुत्रा चावल्याने मरण ओढवले. (Stray Dogs) पराग देसाई यांच्यावर कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी ते धावल्याने पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्याची मागणी केली जात आहे. (Stray Dogs)
कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 36 टक्के मृत्यू रेबीजमुळे होतात. त्यापैकी बहुतांश मृत्यूची नोंदही होत नाही. प्राणी जन्म नियंत्रण नियम 2001 नुसार, भारतात भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. भटक्या कुत्र्यांना मारता येत नाही. फक्त त्यांना निर्बिजीकरण केले जाऊ शकते. भटक्या कुत्र्यांची तक्रार करण्यासाठी तुम्ही तुमच्या शहरातील महानगरपालिकेसह काही स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधू शकता. या एनजीओ कुत्र्यांना वाचवतात आणि लस देण्याचे काम करतात. (Stray Dogs)
(हेही वाचा – Relationship Declaration : ओळख अथवा लग्न लपवून संबंध ठेवल्यास आता होणार मोठी शिक्षा; सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत)
कुत्रा चावल्यानंतर जाणवणारी लक्षणे
- चाव्याच्या ठिकाणी शरीरात तीव्र वेदना
- चाव्याच्या ठिकाणी मुंग्या येणे
- ताप येणे
- चिडचिड करणे
- पक्षाघात होणे
- जास्त लाळ किंवा अश्रू येणे
- मोठ्या आवाजाचा राग येणे
- बोलण्यात अडचण येणे
ही लक्षणे कुत्रा चावल्यानंतर जाणवू शकतात. (Stray Dogs)
कुत्रा चावल्यास करा उपाय
- कुत्रा चावल्यामुळे किरकोळ दुखापत झाली असेल किंवा ओरखडे पडले असतील, तर प्रथम ती जखम स्वच्छ पाण्याने धुवावी.
- विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तुम्ही अँटी-बॅक्टेरियल क्रीम वापरू शकता.
- जखम लहान असल्यास पट्टी किंवा कापड बांधू नका. ते उघडे ठेवा.
- रक्तस्त्राव किंवा मांस दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि प्रथमोपचार करा.
- शक्य तितक्या लवकर किंवा 24 तासांच्या आत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि इंजेक्शन घ्या. (Stray Dogs)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community