Flight Tickets Increase : दिवाळीत विमान प्रवास महागणार

172
Flight Tickets Increase : दिवाळीत विमान प्रवास महागणार
Flight Tickets Increase : दिवाळीत विमान प्रवास महागणार

दिवाळी आणि थंडी म्हणजे पर्यटनाचा हंगाम असल्यामुळे लोक अनेक सहलींचे आयोजन करतात.मात्र कमीत कमी कालावधीत ऐच्छिक ठिकाणी पोहचण्यासाठी लोक विमान प्रवासाला पसंती देतात.  सध्या विमान प्रवासासाठी तीनपट, चारपट अधिक महागडी तिकिटे खरेदी करावी लागणार आहे. दिवाळीसाठी विमान तिकीटदरात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या दिवाळीसाठी मुंबईहून नागपूर, भोपाळ, रायपूर, लखनऊ, दिल्ली, पाटणा, कोलकाता येथे गावी जाणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. (Flight Tickets Increase)
या मार्गांवरील विमानसेवांना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या मार्गावरील तिकीटदरांत मोठी वाढ झाली आहे. दिवाळीची सुरुवात बुधवार, ८ नोव्हेंबरच्या धनत्रयोदशीपासून होत आहे. मात्र त्यामुळे त्यापूर्वीच्या आठवडाअखेरीचे म्हणजे, ४ नोव्हेंबर शनिवार व ५ नोव्हेंबर रविवारचे या मार्गावरील तिकीट ९ ते १० हजार रुपयांच्या घरात गेले आहे. त्यानंतर रविवार, १२ नोव्हेंबरला नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे शनिवार, ११ नोव्हेंबरचे तिकीट दर १२ ते १४ हजार रुपयांवर पोहोचले आहे. मुंबई-पटना व मुंबई-दिल्लीचे ११ नोव्हेंबरचे तिकीट अनुक्रमे १५ हजार ३०० व १४ हजार ७०० रुपयांच्या घरात आहे. अशीच उलट स्थिती परतीच्या मार्गावर दिवाळी संपल्यानंतर शनिवार, १८ नोव्हेंबर व रविवार, १९ नोव्हेंबरला आहे. त्या दिवशी मुंबईत विमानाने परतण्यासाठी किमान ९ ते १२ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. या तुलनेत अहमदाबाद, हैदराबाद, जयपूर, चेन्नई, बेंगळुरू येथे जाणाऱ्यांची गर्दी कमी असल्याने दिवाळीदरम्यान तेथील तिकीटदर सामान्य आहेत. (Flight Tickets Increase)

(हेही वाचा : Kojagiri : दादर सांस्कृतिक मंचच्या वतीने कोजागिरीच्या शुभ्र चांदण्यात गाण्यांचा आनंद)
मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर सर्वाधिक महाग

राज्यात दिवाळीदरम्यान सर्वाधिक महागडा विमान प्रवास मुंबई-नागपूर व पुणे-नागपूर ठरणार आहे. मुंबई-नागपूर प्रवासाचे ४ नोव्हेंबरचे तिकीट १० हजार ३३२ रुपये आहे. त्यानंतर गुरुवार, ९ नोव्हेंबरचे तिकीटही १० हजार ८०० रुपये आहे. मात्र शुक्रवार, १० नोव्हेंबर व शनिवार, ११ नोव्हेंबरच्या तिकीटांसाठी प्रवाशांना तब्बल १४ हजार ७६२ व १५ हजार १९७ रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे पुणे-नागपूर विमानाचे तिकीटही ८ व ९ नोव्हेंबरला १२ ते १४ हजार रुपयांदरम्यान आहे. मात्र १० नोव्हेंबरला या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल १६ हजार ३०० रुपये मोजावे लागणार आहेत. परतीच्या मार्गावर १८ व १९ नोव्हेंबरचे तिकीट दर १२ हजार रुपयांच्या घरात आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.