Mumbai Tree Cutting : भाजपा आमदार आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप, म्हणाले…

उबाठाकडून मुंबईत बिल्डरांसाठी मागील १० वर्षांत सुमारे ३८ हजार ९९९ झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिली गेली.

217
Mumbai Tree Cutting : भाजपा आमदार आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप, म्हणाले…
Mumbai Tree Cutting : भाजपा आमदार आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप, म्हणाले…

मुंबईत आरेला जंगल घोषित केले आणि उबाठा शिवसेनेने स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेतली. पण ही घोषणा कागदावर असून प्रत्यक्षात उबाठाकडून मुंबईत बिल्डरांसाठी मागील १० वर्षांत सुमारे ३८ हजार ९९९ झाडांची कत्तल करण्यास परवानगी दिली गेली. बिल्डरांना “प्रिमियमचे खतपाणी” घातले गेले. त्यामुळे आजघडीला ६ हजार बांधकाम प्रकल्प एकाचवेळी सुरु झाले, त्यामुळे मुंबईत “सिमेंटचे जंगल” उभे केले असल्याचा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी करत उबाठा शिवसेनेचा समाचार घेतला. (Mumbai Tree Cutting)

मुंबईच्या हवा प्रदुषणात वाढ झाली असून गतवर्षी प्रमाणे याही वर्षी मुंबईतील हवेतील प्रदुषणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्वाला जबाबदार तत्कालिन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत, असा आरोप आमदार ॲड शेलार यांनी केला आहे. (Mumbai Tree Cutting)

(हेही वाचा – Water Shortage In Mumbai : महिन्याच्या शेवटच्या दिवशी पश्चिम उपनगरांतील ‘या’ भागात नसेल पाणी)

या बाबत बोलताना आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की, जी मेट्रो वाहनांची संख्या कमी करुन हवा प्रदुषण कमी करणार आहे, ती मेट्रो आणि तीच्या कारशेडचे काम उबाठाने रोखून ठेवले. मुंबईतील कचऱ्यापासून गॅसची निर्मिती केली तर सुमारे ३५० कोटी रुपयांचा नैसर्गिक गॅस मुंबईला उपलब्ध होईल, पण त्यासाठी एक रुपयाचीही तरतूद केली नाही. उलट गरज नसताना पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या समुद्राचे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाची तयारी सुरु केली. (Mumbai Tree Cutting)

तसेच माहुलच्या प्रदुषणकारी कंपन्या स्थलांतरीत करण्याची मागणी आहे, पण तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उबाठा शिवसेना सरकारने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेला १४ हजार कोटींच्या दंडात सवलत देऊन तो ३०० कोटींवर आणला आणि त्यालाही स्थगिती दिली. कंपन्याना न्यायालयीन प्रक्रियेत मदत होईल अशी भूमिका घेतली आणि माहुलमधील “प्रदुषणाच्या भट्ट्या” धगधगत्या ठेवल्या. याबाबत आपण मागिलकाळात विधानसभेचे लक्ष वेधून सरकारकडे चौकशीची मागणीही केली होती, असे सांगत अशा प्रकारे मुंबईत आज जे प्रदुषण होते आहे त्याला उबाठा आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, अशी टीका आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली. (Mumbai Tree Cutting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.