यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर महामार्गावर अज्ञात 10 ते 12 अज्ञातांनी एसटी बस पेटवण्यात आली. (ST Bus Torched) नांदेडच्या हातगाव आगाराची ही बस हातगाववरून नागपूरकडे जात होती. तेव्हा विदर्भ-मराठवाडा सीमेवर उमरखेडजवळील पैनगंगा नदी पुलावर हा प्रकार घडला. बसमधील सर्व 73 प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बस पेटवणाऱ्यांचा शोध सुरू आहे. (ST Bus Torched)
(हेही वाचा – Yamaha R3 : यामाहा आर३ ही प्रिमियम बाईक डिसेंबरमध्ये येणार बाजारात, किंमत कळली तर व्हाल थक्क)
पैनगंगा नदीच्या पुलावर बसला थांबवत अज्ञात लोकांनी आग लावली. तेव्हा बसमध्ये 73 प्रवासी होते. प्रवासी तात्काळ बसमधून बाहेर आल्यामुळे जीवितहानी टळली. या घटनेमागे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांचा हात आहे का, याविषयी तपास सुरू आहे. विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन आधीपासूनच मोठ्या प्रमाणात सुरू आहे. (ST Bus Torched)
राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी गावागावात साखळी उपोषण केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिले जाणार नसल्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच गाड्यांची तोडफोडही केली जात आहे. (ST Bus Torched)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community