Lalit Patil : ड्रग्जतस्कर ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे रोझरी एज्युकेशन ग्रुपपर्यंत; तपास चालू

ललित याची मैत्रिण नाशिकवरून पुण्यात ससून रुग्णालयात भेटण्यास येत असे. तिला भेटण्यासाठी रोझरी स्कूल शेजारील एका सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट देखील अरहाना याने वापरण्यास दिला होता. त्याच्या एटीएम कार्डचा वापर करून नंतर पाटील पसार झाला.

152
Lalit Patil : ड्रग्जतस्कर ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे रोझरी एज्युकेशन ग्रुपपर्यंत ?; तपास चालू
Lalit Patil : ड्रग्जतस्कर ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे रोझरी एज्युकेशन ग्रुपपर्यंत ?; तपास चालू

ड्रग्जतस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर त्याला रोझरी एज्युकेशन ग्रुपचा संचालक विनय अरहाना याने मदत केल्याचे उघड झाले आहे. (Lalit Patil) विनय अरहाना याने चालकाच्या माध्यमातून खर्चासाठी एक एटीएम कार्ड आणि त्याचा गोपनीय पिन पुरवल्याची माहिती समोर आली आहे. ललित याची मैत्रिण नाशिकवरून पुण्यात ससून रुग्णालयात भेटण्यास येत असे. तिला भेटण्यासाठी रोझरी स्कूल शेजारील एका सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट देखील अरहाना याने वापरण्यास दिला होता. त्याच्या एटीएम कार्डचा वापर करून नंतर पाटील पसार झाला. (Lalit Patil)

(हेही वाचा – ST Bus Torched : यवतमाळमध्ये अज्ञातांनी पेटवलेली एसटी बस जळून खाक; ‘हे’ असू शकते कारण)

विनय अरहाना याला ईडीने ४६ कोटी रुपयांचे गैरव्यवहारात अटक केली आहे. तो मुंबईतील तळोजा कारागृहात बंदिस्त होता. आजाराचे कारण देऊन तो सुरुवातीला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. सुरक्षेच्या कारणाने त्याला पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात १६ सप्टेंबर रोजी हलवण्यात आले होते. या वेळी त्याची ललित पाटील याच्याशी ओळख झाली. त्याच ठिकाणी अरहाना याचा कारचालक दत्ता डोके (रा. हडपसर, पुणे) हा जेवणास येत असल्याने त्याची देखील त्याच्याशी ओळख निर्माण झाली. (Lalit Patil)

या ओळखीतून अरहाना याने ललित याला रोझरी स्कुल जवळील सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील स्वतःचा फ्लॅट मैत्रिणीला भेटण्यासाठी वापरण्यास दिला. ३० सप्टेंबर रोजी ललित दुपारच्या सुमारास मैत्रिणीला घेऊन तिथे गेला. त्याच दिवशी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून २ कोटी १४ लाख रुपयांचे ड्रग रॅकेट पकडले, असे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. (Lalit Patil)

न्यायालयाला दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने त्याचा फायदा घेत, ललित पाटील हा विनय अरहाना याच्या मदतीने रुग्णालयातून पसार झाला. ललित पाटील प्रकरणात पोलिस नाशिकसह इतर ठिकाणीही चौकशी करत असल्याचे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणी सविता हनुमंत भागवत या सहायक पोलिस निरीक्षक महिला पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.  (Lalit Patil)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.