Maharashtra Sadan Scam : पंकज आणि समीर भुजबळ यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोंदविलेल्या मूळ गुन्ह्यातून आरोपमुक्त केले असूनही भुजबळ बंधूंना विशेष न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव दिलासा देण्यास नकार दिला. 'सीआरपीसीमध्ये खटला रद्द करण्याची तरतूद नाही', असे तांत्रिक कारण न्या. राहुल रोकडे अर्ज फेटाळतांना दिले.

183
Maharashtra Sadan Scam : पंकज आणि समीर भुजबळ यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
Maharashtra Sadan Scam : पंकज आणि समीर भुजबळ यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

महाराष्ट्र सदन बांधकामासंबंधित ८५० कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात पीएमएलए न्यायालयाने भुजबळ बंधूंना दिलासा दिला नाही. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, मुलगा पंकज, पुतण्या समीर व अन्य ५१ जणांवर २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता. (Maharashtra Sadan Scam) गेल्या वर्षी समीर व पंकज यांनी खटला रद्द करण्यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

(हेही वाचा – Parbhani Police : पोलिसांनीच मांडला जुगार; जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली मोठी कारवाई)

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोखरक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोंदविलेल्या मूळ गुन्ह्यातून आरोपमुक्त केले असूनही भुजबळ बंधूंना विशेष न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव दिलासा देण्यास नकार दिला. ‘सीआरपीसीमध्ये खटला रद्द करण्याची तरतूद नाही’, असे तांत्रिक कारण न्या. राहुल रोकडे अर्ज फेटाळतांना दिले. (Maharashtra Sadan Scam)

समीर व पंकज यांच्यावर महाराष्ट्र सदन प्रकरणी एसीबीने दाखल केलेला गुन्हा आणि नवी मुंबई येथे निवासी इमारत बांधण्याचे आश्वासन देऊनही ती उभारण्यात न आल्याने गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीवरून ईडीने गुन्हा दाखल केला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये पंकज व समीर यांची या दोन्ही गुन्ह्यांतून मुक्तता करण्यात आली. त्यामुळे पंकज व समीर यांनी ईडीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज केला. छगन भुजबळ या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. त्यांनी एसीबी न्यायालयात आरोपमुक्ततेसाठी केलेला अर्ज अद्याप प्रलंबित असल्याने ते विशेष पीएमएलए न्यायालयात दाद मागू शकले नाहीत.

‘मूळ गुन्हा रद्द केल्यानंतर ईडीने पीएमएलएअंतर्गत नोंदविलेला गुन्हा कायम राहू शकत नाही. त्या अनुषंगाने आमच्यावरील खटला रद्द करण्यात यावा’, असे या पंकज आणि समीर यांनी केलेल्या अर्जात म्हटले होते.  (Maharashtra Sadan Scam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.