रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपचे चेअरमन आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना ईमेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Mukesh Ambani Death Threats) धमकी देणाऱ्यांनी २० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. खंडणी न दिल्यास गोळ्या झाडून ठार मारू, असे धमकीच्या ईमेल मध्ये लिहण्यात आले आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात ईमेल धारकाविरोधात खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mukesh Ambani Death Threats)
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल २७ ऑक्टोबर रोजी आला आहे. मुकेश अंबानी यांच्या ईमेलवर ही अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठवून २०कोटी रुपयांची मागणी केली असून ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. “तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालून ठार करू, भारतात आमच्याकडे सर्वोत्तम शार्प शूटर आहेत” असे अंबानी यांना आलेल्या धमकीच्या ईमेल मध्ये लिहण्यात आले आहे.
या ईमेल मुळे एकच खळबळ उडाली असून मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांनी तात्काळ गावदेवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे गावदेवी पोलिसांनी भा.दं.वि.कलम ३८७ (खंडणी) आणि ५०६(२) (जीवे मारण्याची धमकी) अंतर्गत अज्ञात ईमेल कर्त्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान मुकेश अंबानी यांच्या ‘अंटीलिया घराभोवती, तसेच मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हा ईमेल भारताबाहेरून आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात असून या ईमेल कर्त्याच्या शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखा, सायबर गुन्हे तपास करीत आहे. (Mukesh Ambani Death Threats)
हेही पहा –