Asian Para Games 2023 : दोन्ही हात नसलेली पॅराॲथलीट तिरंदाज शीतलचा दुहेरी सुवर्णभेद

Asian Para Games 2023 : पायाने धनुष्यबाण चालवणाऱ्या शीतलने आशियाई पॅरा गेम्समध्ये चक्क दोन सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केलाय. एकाच पॅरा ॲथलीटला एकाच स्पर्धेत दोन सुवर्ण मिळण्याची ही भारताची पहिली खेप आहे

252
Asian Para Games 2023 : दोन्ही हात नसलेली पॅराॲथलीट तिरंदाज शीतलचा दुहेरी सुवर्णभेद
Asian Para Games 2023 : दोन्ही हात नसलेली पॅराॲथलीट तिरंदाज शीतलचा दुहेरी सुवर्णभेद

ऋजुता लुकतुके

दोन्ही हात नसलेली तरुण तिरंदाज पॅरा ॲथलीट शीतल देवीने होआंगझाओ आशियाई पॅरालिम्पिक खेळांमध्ये विक्रमी कामगिरी केलीय. एकाच स्पर्धेत दोन सुवर्ण जिंकण्याची किमया तिने केली आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारताची या स्पर्धेतील पदकांची संख्याही ९९ झाली आहे. (Asian Para Games 2023)

शुक्रवारच्या दिवशी भारताला एकूण १७ पदकं मिळाली. आणि यातील ७ सुवर्ण होती. यातील ४ तर बॅडमिंटनपटूंनी मिळवली. आणि त्याखेरिज एकूण सात पदकं जिंकण्यात बॅडमिंटनपटू यशस्वी झाले. पण, शुक्रवारचा दिवस शातील देवीचाच होता. (Asian Para Games 2023)

शीतलने महिलांच्या कम्पाऊंड तिरंदाजीच्या खुल्या प्रकारात पहिलं सुवर्ण जिंकलं. तिने सिंगापूरच्या अलिम नूरचा पराभव केला. दोन्ही हात नसलेल्या शीतलने पायाने धनुष्या बाण चालवताना अंतिम फेरीत सहा सलग वेळा दहा गुण कमावले.

यापूर्वी शीतलने कम्पाऊंड मिश्र सांघिक प्रकारातही सुवर्ण जिंकलं होतं. त्यामुळे एकाच स्पर्धेत दोन सुवर्ण जिंकण्याची किमया तिने केली. आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय पॅऱा ॲथलीट ठरली आहे. जम्मू काश्मीरची ही तिरंदाज फक्त १६ वर्षांची आहे. आणि या स्पर्धेत खरंतर तिने पदकांची हॅट-ट्रीक केली आहे. दोन सुवर्णांबरोबरच कम्पाऊंडच्या दुहेरी प्रकारात तिने रौप्य जिंकलं आहे.

काश्मीरच्या निर्जन किश्तवर या गावातून आलेली शीतल लहानपणीच अपंग झाली. चेतासंस्थेच्या एका विशिष्ट रोगामुळे तिच्या अवयवांची वाढ नीट झाली नाही. आणि तिचे हात थोटेच राहिले. भारतीय सैन्यदलाच्या एका वैद्यकीय शिबिरात तिच्या रोगाचं निदान झालं. आणि तिच्या घरची परिस्थिती पाहून सैन्यदलाने तिला दत्तक घेऊन तिची जबाबदारी उचलली. तिथेच ती पायाने धनुष्यबाण चालवायला शिकली. (Asian Para Games 2023)

भारताने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पदक तालिकेत भारतीय पथक चौथ्या स्थानावर आहे.

पुरुषांच्या १५०० मीटर धावण्याच्या टी३४ प्रकारात रमण शर्माने आशियाई विक्रमासह सुवर्ण जिंकलं. ४ तास २० मिनिटांत त्याने शर्यत पूर्ण केली. याशिवाय स्पर्धेचा शेवटचा दिवस भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंनी गाजवला. त्यांनी चार सुवर्णांसह एकूण ८ पदकं जिंकली. (Asian Para Games 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.