मराठी चित्रपट अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या घरातून १० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. (Pushkar Shrotri) या चोरीप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या मोलकरणीसह तिच्या पतीला अटक केली आहे. (Pushkar Shrotri)
भानुदास गांगुर्डे आणि उषा गांगुर्डे असे अटक करण्यात आलेली मोलकरीण आणि तिच्या पतीचे नाव आहे. अभिनेते पुष्कर श्रोत्री हे विलेपार्ले पूर्व येथे राहतात. पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या आजारी वडिलांची देखरेख करण्यासाठी दोन महिला आणि घरकाम करण्यासाठी उषा गांगुर्डे यांना ठेवले होते. श्रोत्री यांची पत्नी काही कामानिमित्त दुबई येथे गेलेल्या होत्या. पुष्कर श्रोत्री हेही ऑगस्ट महिन्यात व्यवसायानिमित्त अमेरिकेत गेले होते. जाण्यापूर्वी ते वडिलांना एक लाख २० हजार रुपये रोकड देऊन गेले होते. सप्टेंबर महिन्यात भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी वडिलांकडे पैशांची चौकशी केली असता त्यांना पैशाबद्दल काहीही माहीत नसल्याचे सांगितले. (Pushkar Shrotri)
(हेही वाचा – ITR Filing : आर्थिक विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या ८ वर्षांत ९० टक्क्यांनी वाढ)
दासऱ्याच्या दिवशी पुष्कर यांच्या पत्नीने कपाटातील दागिने काढण्यासाठी कपाट उघडले असता त्यातील काही दागिने आढळले नाहीत. घरातील रोकड आणि दागिने चोरीला गेल्यामुळे पुष्कर यांनी मोलकरीण उषा गांगुर्डे वर संशय घेऊन विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विलेपार्ले पोलिसांनी उषा गांगुर्डेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली असून दागिने आणि पैसे पतीला दिल्याचे सांगितले. पोलिसांनी मोलकरीण आणि तिचा पती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. (Pushkar Shrotri)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community