Yamaha MT 03 : यामाहाच्या या नवीन स्ट्रीट बाईकची किंमत पाहिलीत का?

यामाहा कंपनी या वर्षीच्या शेवटी आपल्या दोन प्रिमिअम श्रेणीतील बाईक भारतात लाँच करत आहे. यामाहा आर३ आणि यामाहा एमटी ०३ असा या दोन्ही बाईक ४,००,००० रुपयांपासून सुरू होतील असा अंदाज आहे

207
Yamaha MT 03 : यामाहाच्या या नवीन स्ट्रीट बाईकची किंमत पाहिलीत का?
Yamaha MT 03 : यामाहाच्या या नवीन स्ट्रीट बाईकची किंमत पाहिलीत का?
  • ऋजुता लुकतुके

यामाहा कंपनी या वर्षीच्या शेवटी आपल्या दोन प्रिमिअम श्रेणीतील बाईक भारतात लाँच करत आहे. यामाहा आर३ आणि यामाहा एमटी ०३ असा या दोन्ही बाईक ४,००,००० रुपयांपासून सुरू होतील असा अंदाज आहे. (Yamaha MT 03)

यावर्षी भारतात होणाऱ्या भारतीय मोटोजीपी शर्यती दरम्यान यामाहा ही दुचाकी उत्पादक कंपनी आपल्या दोन प्रिमिअम श्रेणीतील बाईक भारतात लाँच करणार आहे. एकूणच देशात प्रिमिअम बाईक क्षेत्रात आता मोठी हलचल दिसत आहे. यात यामाहा कंपनी ज्या दोन बाईक आणण्याच्या तयारीत आहे त्या आहेत आर३ आणि एमटी०३. (Yamaha MT 03)

२०२० मध्ये देशात पर्यावरण विषयक नियमांमध्ये काही बदल झाले. त्यानंतर कंपनीला आर३ ही स्पोर्टप्रिमिअम बाईक बंद करावी लागली होती. पण, आता ते नवीन रुपात ही बाईक परत आणणार आहेत. त्याच बरोबर स्ट्रीट प्रकारातील एमटी०३ ही बाईकही नवीन रुपात लोकांसमोर येणार आहे. दोन्ही बाईक सीबीयू म्हणजे इंडोनेशियामधून आयात होणार आहेत. सीबीयू म्हणजे कम्प्लिटली बिल्ट अप युनिट. म्हणजेच कंपनीच्या मूळ कारखान्यात तयार होऊन बाहेरच्या देशात निर्यात होणारी उत्पादन. (Yamaha MT 03)

(हेही वाचा – M S Dhoni : महेंद्रसिंग धोनीने दिले आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याचे संकेत)

इथं या बाईक इंडोनेशियात तयार होणार आहेत आणि तिथून भारतात त्या आयात होतील. नवीन एमटी०३ बाईकमध्ये अनेक मूलबूत बदल कंपनीने केले आहेत. नवीन स्टाईल आणि डिझाईन, एलईडी हेडलँप्स आणि युएसडी फोर्क या बाईकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. (Yamaha MT 03)

६ स्पीड गियरबॉक्स असून ३२१ सीसी क्षमतेचं ट्विन इंजिन या बाईकमध्ये आहे. एका लीटरमध्ये गाडी साधारण १९ किमीपर्यंत धावू शकते. स्पोर्ट प्रिमिअम श्रेणीच्या या बाईकची किंमत ४ लाख रुपयांपासून पुढे सुरू होईल, असाच अंदाज आहे. या बाईकची स्पर्धा बेनेली टीएनटी ३००, क्यूजे मोटर ४०० यांच्याशी असेल. (Yamaha MT 03)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.