संसदेच्या आचार समितीने तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रॅंड खासदार महुआ मोईत्रा यांची मागणी फेटाळून लावली आहे. यामुळे महुआ मोईत्रा यांच्या कुंडलीतील राहू आणि केतूच्या घरात उद्योगपती दर्शन हिरानंदानी आणि अधिवक्ता अनंत डेहाडाराय ठाण मांडून बसले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Cash For Query Row)
सविस्तर वृत्त असे की, संसदेच्या आचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी पश्चिम बंगालच्या क्रिष्णानगरच्या खासदार महुआ मोईत्रा यांची मागणी फेटाळून लावली आहे. समितीपुढे हजर होण्यासाठी पाच नोव्हेंबरनंतरची कोणतीही तारीख द्यावी, अशी मागणी मोईत्रा यांनी पत्र लिहून केली होती. परंतु, आचार समितीने ही मागणी फेटाळून लावत मोईत्रा यांना २ नोव्हेंबर रोजी समितीपुढे जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. (Cash For Query Row)
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict : इस्रायलपुढे हमासची भुयारे नष्ट करण्याचे आव्हान, संरक्षण मंत्री योआव्ह गॅलंट यांनी दिली माहिती)
महुआ मोईत्रा संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतात असा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लावला होता. या आरोपाची दखल घेत आचार समितीने मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबर रोजी समितीपुढे आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, व्यस्त कार्यक्रमामुळे चार नोव्हेंबरपर्यंत हजर होता येणार नाही, असे मोईत्रा यांनी कळविले होते. (Cash For Query Row)
मोइत्रा यांनी भेटवस्तू आणि पैशांच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून महुआवर पैसे घेतल्याचा आणि एका व्यावसायिकाच्या हिताशी संबंधित प्रश्न विचारल्याचा आरोप केला आहे. यामुळे त्यांचे सदस्यत्व संपविण्यात यावे अशी मागणी दुबे यांनी केली आहे. आचार समितीने ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात वकील जय आनंद देहाडराय आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे जबाब २६ ऑक्टोबरला नोंदवले होते. आता मोईत्रा यांची बाजू मांडणे बाकी आहे. (Cash For Query Row)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community