बिहारमधील (Bihar) सरकारी शाळेत संस्कृत विषयाच्या प्रश्नपत्रिकेत इस्लामशी संबंधित प्रश्न विचारल्यामुळे तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेता गिरीराज सिंह (Union Minister BJP leader Giriraj Singh) यांनी याला बिहारमध्ये संस्कृतचे इस्लामीकरण म्हटले असून यावर घटनेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
बिहारमधील सरकारी शाळेत नववीच्या वर्गात संस्कृत परीक्षेत विचारले जाणारे अनेक प्रश्न इस्लामशी संबंधित आहे. शिक्षण विभागाच्या के के पाठक यांनी अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून ते अनेक नवनवीन प्रयोग करत आहेत. यावेळी त्यांनी बिहारच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता दर महिन्याला परीक्षेला बसावे लागेल, असा आदेश दिला होता. याच दरम्यान इयत्ता ९वीमध्ये संस्कृत विषयाची परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत इस्लामशी संबंधित एकूण १० प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रसंगामुळे विद्यार्थ्यांमध्येही खळबळ उडाली आहे.
(हेही वाचा – Cash For Query Row : आचार समितीने मोईत्रा यांची मागणी फेटाळली; २ नोव्हेंबरला हजर होण्याचे दिले आदेश )
भाजपचे नेता गिरीराज सिंह यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत विषयात इस्लामशी संबंधित प्रश्न विचारल्याबाबत सोशल मिडिया Xवर पोस्ट लिहून या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बिहारमध्ये संस्कृत विषयाचे इस्लामीकरण करण्यात येत आहे. बिहारच्या सरकारी शाळांमध्ये संस्कृत परीक्षेत इस्लामशी संबंधित विचारलेले प्रश्नही त्यांनी या पोस्टमध्ये दिले आहेत. . १. इफ्तार म्हणजे काय? २. रोजा कोणत्या वेळी सोडला जातो ? रोजा सोडताना काय पाहिले जाते? ३. फितरा कशाला म्हणातात? ४. ईददरम्यान कोणकोणते पदार्थ तयार केले जातात? ५. ईद कोणता सण आहे? ६. जकात कशाला म्हणतात? ७. मुसलानांचे सर्वोत्तम पर्व कोणते? ८. ईदमध्ये कोणता पदार्थ प्रसिद्ध आहे? ९. ईदनिमित्त काय काय केलं जात? १०. ईद काय संदेश देत? – हे प्रश्न विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community