SP vs Congress : सपाच्या वोटबॅंकेवर काँग्रेसची वक्रदृष्टी; अखिलेश यादव राहुल गांधीवर नाराज?

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून 'इंडिया' आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी, काँग्रेस पक्ष सपाच्या पायाखालची जमीन सरकविण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब उघड झाली आहे.

119
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात Congress चा खेळ बिघडविणार
  • वंदना बर्वे

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून ‘इंडिया’ आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी, काँग्रेस पक्ष सपाच्या पायाखालची जमीन सरकविण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब उघड झाली आहे. सपाच्या पारंपारिक वोटबॅंक आपल्याकडे करण्यासाठी काँग्रेस गुप्तपणे प्रयत्न करीत आहे. यामुळे अखिलेश यादव अस्वस्थ झाले आहेत. (SP vs Congress)

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात छत्तीसचा आकडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील विरोधी पक्ष भाजपचा सामना करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या झेंंड्याखाली एकजूट झाले होते. परंतु, आता काँग्रेस सपाचा सफाया करण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचे दिसून येत आहे. उत्तरप्रदेशातील मुस्लिम समाज हा समाजवादी पक्षाची पारंपारिक वोटबॅंक आहे. याच वोटबॅंकेवर काँग्रेसची वक्रदृष्टी पडली आहे. जातीनिहाय जनगणना आणि ओबीसीच्या मुद्यानंतर काँग्रेसने मुस्लिम समाजाला गळ घालायला सुरुवात केली आहे. (SP vs Congress)

सपातील मुस्लिम समाजाचे नेते आझमखान यांना अलिकडेच न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मात्र, आझमखान यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कोणतीही उणीव राहू देणार नाही, असे विधान काँग्रेसचे अजय रॉय यांनी अलिकडेच केले होते. याच विधानामुळे अखिलेश यादव यांचे पित्त खवळले आहे. मुळात, आझमखान यांची लढाई लढण्याचे विधान करून काँग्रेसने मुस्लिम समाजात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काँग्रेसला आझमखान यांची काळजी करण्याची गरज नाही. सपा त्यासाठी सक्षम आहे. किंबहुना, आझमखान यांना अडकविले जात होते तेव्हा काँग्रेस पक्ष कुठे होता? असा उलटप्रश्न अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. (SP vs Congress)

(हेही वाचा – Bihar: बिहारमध्ये संस्कृत विषयाच्या प्रश्नपत्रिकेत इस्लामशी संबंधित १० प्रश्न)

‘इंडिया’ आघाडीत सर्व काही आलबेल नाही हे यावरून सिध्द होत असल्याची चर्चा देशाची राजधानी दिल्लीत रंगली आहे. यूपीबद्दल बोलायचे झाले तर विधानसभेच्या निवडणुकीत सपा-बसपाला मतदान करणारा मुस्लिम समाज लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पर्याय निवडू शकतो, असे तज्ज्ञांना वाटत आहे. मागच्या निवडणुकीत ७९ टक्के मुस्लिमांनी सपाला तर काँग्रेसला केवळ चार टक्के मुस्लिमांची मते मिळाली होती. परंतु, २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत चित्र थोडे वेगळे होते. लोकसभेच्या निवडणुकीत ७३ टक्के मुस्लिमांनी सपा-बसपा युतीला मतदान केले होते. तर १४ टक्के मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान केले होते. ओबीसींमधील यादव आणि मुस्लिम समाज सपाची वोटबॅंक आहे. परंतु २०१९ मध्ये सपा-बसपा युतीला १४ टक्के तर काँग्रेसला पाच टक्के ओबीसींची मते मिळाली होती. काँग्रेस आता यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. (SP vs Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.