शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना इंग्रजीतून पत्र लिहून, मुंबईत भटक्या कुत्र्यांकडून लोकांवर होणारे वाढते हल्ले व त्यांच्यामुळे लोकांना होणारा त्रास याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतील भटक्या कुत्र्यांकडून होणारे वाढते हल्ले आणि त्यांच्यामुळे होणारा त्रास यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भटक्या कुत्र्यांसाठी मुंबईत निवारागृह बांधण्याची मागणी त्यांनी केली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी आयुक्तांना लिहिलेल्या या पत्रामध्ये, भटके कुत्रे हे एकत्रपणे लहान मुलांवर, लोकांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करतात आणि त्यांचे चावा घेतात असे प्रकार घडत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Mumbai Street Dogs)
मुंबईत वर्षाला सुमारे ६५,००० अशा घटनांची नोंद होते. एका सर्वेक्षणात ८२ टक्के लोकांवर त्यांच्या शेजारच्या भागातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. गत वर्षी हे प्रमाण प्रमाण ६१ टक्के एवढे होते, ज्यामुळे भटक्या कुत्र्यांबाबत समाजात प्रचंड भीती पसरली आहे. मुंबई ६७ टक्के कुत्र्यांचा धोका असून अलीकडेच एका आघाडीच्या कंपनीच्या संचालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईत भटक्या कुत्र्यांनी पोस्टमनवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या ही वारंवार उद्भवत आहे, आणि आपल्या नागरिकांच्या आणि स्वतःच्या प्राण्यांच्या कल्याणासाठी आपण ती सोडवण्यासाठी महापालिकेच्यावतीने कृती करणे अत्यावश्यक आहे. यातील अनेक भटक्या कुत्र्यांची योग्य काळजी घेतली नाही, त्यांना पोषण किंवा वैद्यकीय मदतही मिळत नाही, ज्यामुळे त्यांच्यामध्ये विविध आजार होतात हे उघड आहे. दुर्दैवाने, यापैकी काही कुत्रे या विविध आजारांना बळी पडतात, असे त्यांनी म्हटले आहे. (Mumbai Street Dogs)
या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या भटक्या कुत्र्यांसाठी एक निवारागृह उभारले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. असा निवारागृह बांधल्यास या प्राण्यांना एक सुरक्षित आणि मानवीय वातावरण प्रदान केले जाऊ शकते. त्यांची या माध्यमातून आवश्यक काळजी घेतली जाईल शिवाय त्यांच्यावर वैद्यकीय उपचार होऊ शकतात. यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि हल्ले तर कमी होतीलच, पण या प्राण्यांच्या एकूण आरोग्यासाठी आणि आरोग्यालाही हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Mumbai Street Dogs)
(हेही वाचा – SP vs Congress : सपाच्या वोटबॅंकेवर काँग्रेसची वक्रदृष्टी; अखिलेश यादव राहुल गांधीवर नाराज?)
शिवसेना खासदाराचे आयुक्तांना इंग्रजीतून पत्र
शिवसेनेचे मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडूनच आता मराठी भाषेतून कारभार करण्यास असमर्थता दर्शवली जात आहे. केंद्रात इंग्रजी भाषेत केला जाणारा पत्रव्यवहार करणाऱ्या शेवाळेंकडून आता मुंबई महापालिका आयुक्तांशीही इंग्रजी भाषेतूनच पत्रव्यवहार केला जात आहे. मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात शेवाळेंनी आयुक्तांना लिहिलेले पत्र चक्क इंग्रजी भाषेतील असून मराठी भाषेचा अट्टाहास करणाऱ्या शिवसेनेच्या खासदाराकडूनच इंग्रजीतून पत्र व्यवहार महापालिकेला होत असल्याने मुंबईतील खासदाराला मराठी भाषेचा विसर पडला का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. (Mumbai Street Dogs)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community