Rashtriya feriwala dhoran : मुंबईत फेरीवाल्यांच्या मतदार यादीला मंजुरी, लवकरच घेतली जाणार निवडणूक

मुंबईमध्ये तब्बल १० हजार ३३० परवाना धारक फेरीवाले असून २०१४च्या सर्वेमध्ये अर्ज केलेल्या ९९ हजार अर्जदारांपैंकी केवळ २२ हजार ४८ फेरीवाले मतदानास पात्र ठरले आहे.

305
Rashtriya feriwala dhoran : मुंबईत फेरीवाल्यांच्या मतदार यादीला मंजुरी, लवकरच घेतली जाणार निवडणूक

मुंबईमध्ये तब्बल १० हजार ३३० परवाना धारक फेरीवाले असून २०१४च्या सर्वेमध्ये अर्ज केलेल्या ९९ हजार अर्जदारांपैंकी केवळ २२ हजार ४८ फेरीवाले मतदानास पात्र ठरले आहे. यासर्व ३२ हजार फेरीवाल्यांची मतदार यादी टाऊन वेंडींग समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली असून ही मतदार यादी मंजूर करून कामगार आयुक्तांकडे पाठवली जाणार आहे. या मतदार यादीच्या आधारे कामगार आयुक्त लवकरच निवडणूक जाहीर करून फेरीवाल्यांचे प्रतिनिधी निवडले जाण्याची प्रक्रिया राबवलली जाईल. दरम्यान गुरुवारी झालेल्या टाऊन वेंडींग कमिटीची बैठक केवळ २० मिनिटांमध्ये आयुक्तांनी गुंडाळत हा प्रस्ताव सदस्यांचे मत विचारात न घेतला प्रस्ताव मंजूर केला. (Rashtriya feriwala dhoran)

मुंबई महापालिकेच्याच्या संकेत स्थळावर पथ विक्रेता म्हणून सिध्दता पूर्ण करणाऱ्या फेरीवाल्यांची यादी प्रदर्शित करून हरकती व व सूचना मागवत एकूण ३२ हजार फेरीवाल्यांच्या मतदारांची यादी तयार करण्यात आली. यासाठी १४ जुलै २०२३पर्यंत याबाबत हरकती व सूचना मागवण्यात आल्यानंतर नवीन सुधारीत यादी तयार केली. ही अंतिम मतदार यादीचा प्रस्ताव गुरुवारी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या टाऊन वेंडींग समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. त्या बैठकीत हा प्रस्ताव मतदानाला टाकून त्याला मंजुरी देण्यात आली. ही यादी आता कामगार आयुक्तांकडे पाठवून निवडणुकीची प्रक्रिया राबवून फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींची निवडणूक कामगार आयुक्तांमार्फत जाहीर केली जाईल. (Rashtriya feriwala dhoran)

(हेही वाचा – Sharad Pawar : मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखावी…शरद पवारांचे प्रत्युत्तर)

ही बैठक अवघ्या २० मिनिटांमध्ये आटोपली गेली, यामध्ये सदस्यांना कोणत्याही प्रकारे भूमिका तसेच मत मांडण्याची पूर्ण संधी दिली गेली नाही. या मतदार यादीबाबत एका सदस्याने तर फेरीवाल्यांमधून प्रतिनिधीची निवड केल्यास फेरीवाल्यांचे म्होरकेच या समितीत येतील आणि ते आयुक्तांसमोर कोणतेही मत किंवा भूमिका मांडू शकत नाही. त्यामुळे फेरीवाल्यांमधून प्रतिनिधी नेमण्यास काही सदस्यांचा आक्षेपही होता, पण आयुक्तांनी कुणाचेही ऐकून न घेता या मतदार यादीचा प्रस्ताव मंजूर केला. (Rashtriya feriwala dhoran)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.