इस्रायल आणि हमास (Israel-Hamas Conflict) यांच्यामध्ये गेल्या २२ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. युद्धादरम्यान इस्रायली संरक्षण दलाचा दावा आहे की, हमासच्या हल्ल्यात १,४०० हून अधिक लोक मारले गेले आणि ५,४०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून युद्धाची धुमश्चक्री सुरूच आहे. इस्रायली लष्कराने वेस्ट बँकमधील अनेक इमारतींवर बुलडोझरचा वापर केला आहे. यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे.
आज इस्रायली सैन्याने पश्चिम किनार्याच्या रामल्ला येथे परवानगीशिवाय बांधल्या जात असलेल्या अल जलाझून निर्वासित शिबिरातील कैदी बाजेस नखलेहच्या घरावर बुलडोझर चालवला. हमासच्या हवाई दलाचा प्रमुख अबू रकाबा याला इस्त्रायली सैन्याने गाझामध्ये ठार केले आहे.
#BREAKING| Israeli forces continue to bulldoze the house of the detainee Bajes Nakhleh in Al Jalazoun refugee camp in Ramallah in the #WestBank under the pretext of being built without a permission. pic.twitter.com/Tf8bfIC4lM
— Quds News Network (@QudsNen) October 28, 2023
इस्त्रायल संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, हमासच्या यूएव्ही, ड्रोन, पॅराग्लायडर्स एरियल डिटेक्शन आणि डिफेंस सिस्टिम (संरक्षण यंत्रणा) यावर देखरेख करण्याची जबाबदारी रकाबाकडे होती. इस्त्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या नियोजनात अबू रकाबा याचा सहभाग होता. त्याने दहशतवाद्यांच्या गटाची जबाबदारी घेतली होती. त्याने पॅराग्लायडरच्या माध्यमातून इस्रायलमध्ये घूसखोरी केली होती. याशिवाय तो आयडीएफ पोस्टवरील ड्रोन हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.
Join Our WhatsApp Community