Amrit Kalash Yatra : ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातून अमृत कलश यात्रा दिल्लीत दाखल

अमृत कलश यात्रेसाठी राज्यातून ४१४ कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वेने शुक्रवारी मुंबई सेंट्रल रेल्वे येथून दिल्लीकडे मार्गस्थ झाली होती. मुख्यमंत्री यांनी या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.

391
Amrit Kalash Yatra : 'माझी माती माझा देश' उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातून अमृत कलश यात्रा दिल्लीत दाखल
Amrit Kalash Yatra : 'माझी माती माझा देश' उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातून अमृत कलश यात्रा दिल्लीत दाखल

‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून एकत्र केलेल्या मातीचे अमृत कलश यात्रा शनिवारी (२८ ऑक्टोबर) दिल्लीत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन वर दुपारी २.३० वाजता दाखल झाली. याबाबतचा राज्यस्तरीय सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऑगस्ट क्रांती मैदनावर पार पडला होता. (Amrit Kalash Yatra)

अमृत कलश यात्रेसाठी राज्यातून ४१४ कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वेने शुक्रवारी मुंबई सेंट्रल रेल्वे येथून दिल्लीकडे मार्गस्थ झाली होती. मुख्यमंत्री यांनी या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. (Amrit Kalash Yatra)

(हेही वाचा – Pulses Price Hike : सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती आटोक्यात ठेवण्याचं आव्हान)

अमृत कलश यात्रा आज दिल्लीत निजामुद्दीन येथे दाखल झाली. यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार व दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने स्वयंसेवकांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्यने दिल्लीस्थित मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Amrit Kalash Yatra)

देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेल्या देशव्यापी मेरी माती मेरा देश मोहिमेची सांगता ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. देशभरातून गोळा केलेले अमृत कलश दिल्लीतील कर्तव्यपथ इथल्या अमृतवाटिका इथे संकलित करून समारंभपूर्वक स्थापन केले जाणार आहेत. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि ध्वनिसंगीताचा समारंभ होणार आहे. (Amrit Kalash Yatra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.