इंजिनियर हे अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत. या केमिकल इंजिनियर यांना मोठ्या रकमेचे अमिष दाखवून त्याच्याकडून एमडी या अमली पदार्थांचा फॉर्म्युला तयार करून घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांच्या साकीनाका पोलीस आणि गुन्हे शाखेने हैद्राबाद आणि डेहराडून येथून दोन केमिकल इंजिनियर यांना अटक केली आहे. साकीनाका पोलिसांनी नाशिक येथील ३०० कोटी ड्रग्ज प्रकरणात हरिश्चंद्र पंत उर्फ डॉक्टर याला तर गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने सोलापूर येथील ड्रग्ज प्रकरणात कैलासन वनमाली या ५८ वर्षीय केमीकल इंजिनियरला अटक केली आहे. या पूर्वी देखील अनेक केमीकल इंजिनियर अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी हे केमिकल इंजिनियर ड्रग्ज माफियांना ‘एमडी’ (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ बनविण्याचा फॉर्म्युला देऊन बक्कळ पैसा कमवत असल्याचे समोर आले आहे. (Chemical Engineer In Drug Case)
साकीनाका पोलिसांनी ललित पाटील ३०० कोटीच्या ड्रग्ज प्रकरणात डेहराडून येथून हरिशचंद्र पंत या केमिकल इंजिनियरला अटक केली आहे. पंत हा केवळ २८ वर्षाचा तरुण आहे. पंतला त्याच्या रासायनिक द्रव्य निर्मितीच्या ज्ञानामुळे तो “डॉक्टर” या नावाने ओळखले जाते. तपासादरम्यान, साकीनाका पोलिसांना कळले की त्याने ड्रग्ज रॅकेटर ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण यांना ड्रग्ज तयार करण्यासाठी मशिनरी उभारण्यास मदत केली होती. साकीनाका पोलीस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “असेही कळले आहे की पंतने अनेकांना महानगरामध्ये तसेच नाशिक आणि पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी एमडी तयार करण्यासाठी यंत्र सामुग्री उभारण्यास मदत केली आहे. ६ ऑक्टोबर रोजी साकीनाका पोलिसांनी श्री गणेशाय फार्मास्युटिकल्सच्या नावाखाली कथितरित्या ड्रग्ज तयार करणाऱ्या नाशिक युनिटमधून जप्त करण्यात आलेल्या ३०५ कोटी रुपयांच्या एमडी प्रकरणी हरीशचंद्र पंत याला अटक करण्यात आली असून या गुन्ह्यातील तो १८ वा आरोपी आहे. (Chemical Engineer In Drug Case)
(हेही वाचा – Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड)
दरम्यान मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने दोन आठवड्यापूर्वी केलेल्या कारवाईत सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी येथे एमडीचा कारखाना उध्वस्त करून सुमारे ११६ कोटी रुपयांचा एमडी आणि कच्चा माल जप्त केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने २ जणांना अटक केली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी हा दळवी असून तो फरार आहे. दरम्यान गुन्हे शाखेने शुक्रवारी हैद्राबाद येथून कैलासन वनमाली (५८) अटक करण्यात आली आहे. कैलासन हा केमिकल इंजिनियर असून त्यानेच सोलापूर तसेच पुणे जिल्ह्यातील काही भागात एमडीचा कारखाना उभा करून देण्यास मदत करून त्यांना एमडी या अमली पदार्थ तयार करण्याचा फॉर्म्युला दिल्याचे समोर आले. वनमाली याने या एमडी च्या फार्म्युल्या मधून कोट्यवधींची माया गोळा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या परिसरात सुरु असणाऱ्या केमिकल फॅक्ट्रीच्या नावाखाली एमडीचे कारखाने उभे करण्यास केमिकल इंजिनीअर यांचा मोठा सहभाग असल्याचे मागील काही कारवाईत समोर आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथके, मुंबई गुन्हे शाखेने यापूर्वी देखील करण्यात आलेल्या एमडी प्रकरणात केमिकल इंजिनियरांना अटक झालेली असल्याची माहिती एका पोलीस अधिकारी यांनी दिली. (Chemical Engineer In Drug Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community