Maratha Reservation : सरकार ‘ॲक्शन मोडवर’; उपसमितीची तातडीची बैठक

164
Maratha Reservation : सरकार ‘ॲक्शन मोडवर’; उपसमितीची तातडीची बैठक

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक उद्या म्हणजेच सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती स्वतः उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

या बैठकीत मराठवाड्यातील मराठा (Maratha Reservation) समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेली समिती आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे. यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

(हेही वाचा – BMC : अखेर महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने २ हजार संगणकांची खरेदी)

मनोज जरांगे-पाटील (Maratha Reservation) यांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सोमवारच्या बैठकीतही काही निर्णय घेतले जातील. मनोज जरांगे-पाटील यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी समंजसपणा घ्यावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

तसेच जरांगेंनी सरकारशी चर्चा करावी. आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सरकार बांधिल आहेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन हमी दिली आहे. शपथ फळाला यावी म्हणून मी प्रयत्न करेन. मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारशी चर्चा करावी असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.