Megablock : प्रवाशांचे ‘मेगा’ हाल; मुंबई लोकलच्या ‘या’ दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

130
Mega Block : रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगा ब्लॉक

आज म्हणजेच रविवार, २९ ऑक्टोबर रोजी घरातून बाहेर पडण्यापूर्वी थोडा विचार करून बाहेर पाडा. कारण आज मुंबई लोकलच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेने (Western Railway) वसई रोड ते विरार स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक जाहीर केला आहे.

रविवारी ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गांवरही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. अशातच एक दिलासादायक बाब म्हणजे, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर आज कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

रेल्वे रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेसह इतर काम करण्यासाठी मध्य रेल्वेमधील ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे – वाशी / नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक (Megablock) जाहीर केला आहे.

(हेही वाचा – Twitter Financial Service : एलॉन मस्क यांनी दिले ट्विटवर आर्थिक सेवा सुरू करण्याचे संकेत )

ट्रान्सहार्बर वरील ब्लॉक

ठाणे – वाशी/नेरूळ अप आणि डाऊन कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 परिणाम : ब्लॉक वेळेत ठाणे – वाशी / नेरूळदरम्यान लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. (Megablock)

पश्चिम रेल्वेमार्गावरील ब्लॉक :

वसई रोड – विरार अप आणि डाऊन धीमा मार्ग कधी : शनिवारी रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी ते रविवारी पहाटे 4 पर्यंत परिणाम : ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येतील. (Megablock)

मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील आजचा मेगाब्लॉक (Megablock) पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज जम्बो मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.