Israel Hamas War : हमासचे पाकिस्तानच्या पावलावर पाऊल; १९४७च्या युद्धातील कुटील जिहादी नितीचा इस्रायलविरोधात अवलंब

गाझा शहरातील शिफा हॉस्पिटल सध्या हमासच्या दहशतवादी ऑपरेशनचे मुख्य तळ बनले आहे. अशा प्रकारे गाझामध्ये अनेक ठिकाणी रुग्णालयांभोवती लष्करी तळ उभारण्यात आले आहेत. ही सर्व बोगस रुग्णालये असून, दहशतवाद्यांना इस्रायलच्या माऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हमासने हा कुटील डाव आखला आहे.

151
Israel Hamas War : हमासचे पाकिस्तानच्या पावलावर पाऊल; १९४७च्या युद्धातील कुटील जिहादी नितीचा इस्रायलविरोधात अवलंब
Israel Hamas War : हमासचे पाकिस्तानच्या पावलावर पाऊल; १९४७च्या युद्धातील कुटील जिहादी नितीचा इस्रायलविरोधात अवलंब

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने आता पाकिस्तानच्या पावलांवर पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. (Israel Hamas War) १९४७च्या युद्धात पाकिस्तानने भारताविरोधात ज्या कुटील जिहादी नितीचा अवलंब केला होता, तिच निती आता हमासने इस्रायलविरोधात अवलंबली आहे. त्यामुळे हा जिहादी दहशतवाद वेळीच ठेचला नाही, तर जगावर घोंगावणारे संकट वादळाचे स्वरूप धारण करेल.

(हेही वाचा – Western Railway: पश्चिम रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड; लोकलच्या ३१६ फेऱ्या रद्द)

१४ ऑगस्ट १९४७ ला संयुक्त भारतीय लष्कराची विभागणी झाली. त्या वेळी लष्करातील मुस्लीम पलटणी पाकिस्तानकडे गेल्या. उर्वरित सेना भारताकडे राहिली. एकत्र असताना देशातील ही अत्यंत शिस्तबद्ध सेना होती. मात्र, पाकिस्तान स्वतंत्र देश घोषित झाल्यानंतर विभाजित झालेल्या पाक लष्कराने ‘जिहादी टेररिस्ट आर्मी’चे स्वरूप धारण केले. २१ ऑक्टोबर १९४७ च्या पहाटे सारे भारतीय नागरिक निद्रेत असताना पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केली. त्या एका रात्रीत त्यांनी जवळपास ३० हजार निष्पाप जिवांची कत्तल केली. हजारो महिलांवर अत्याचार केले. (Israel Hamas War)

अशा वेळी भारताने सुरक्षेच्या हेतूने ‘बाघ फोर्ट’ परिसरात हवाई हल्ला करण्याचे नियोजन केले. त्याची कुणूक लागताच पाकिस्तानने रेडक्रॉसच्या तत्कालीन अध्यक्षाची (सारा मॅक्विन) मदत घेऊन मानवी ढाल पुढे केली. पंजाब (पाकिस्तान) प्रांताच्या तत्कालीन गर्व्हनरची ती पुतणी होती. आपण ‘बाघ फोर्ट’ परिसरातील तथाकथित रेडक्रॉस रुग्णालयांची पहाणी करण्यासाठी जाणार असल्याने, या भागातील कारवाया थांबवण्यात याव्यात, अशी मागणी तिने भारताकडे केली आणि त्याला प्रतिसाद देत भारतीय लष्कराचे ब्रिटिश प्रमुख जनरल बुचर यांनी हवाई दलाला थांबण्याचे निर्देश दिले. वास्तवात या रुग्णालयांच्या आड पाकिस्तानने आपले लष्करी तळ उभारले होते. आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी हा कुटील डाव आखला होता. मात्र, तत्कालीन हवाई दलाच्या प्रमुखांनी वेळीच हा डाव ओळखून बॉम्ब हल्ले थांबवण्यास नकार दिला. पाकिस्तानमधील रेडक्रॉसच्या प्रमुख सारा मॅक्विन यांना काश्मीरमध्ये येण्याचा कोणताही अधिकार नाही, असे त्यांनी खडसावले. त्यामुळे पाकड्यांचा डाव फसला.

पाकिस्तानची हीच जिहादी नीती वापरून हमासने जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. इस्रायलचा मारा परतवून लावण्यात पूर्णतः अपयशी ठरल्यानंतर त्यांनी आता मानवी ढाल पुढे करीत रुग्णालयांभोवती दहशतवाद्यांचे तळ उभारले आहेत. गाझा शहरातील शिफा हॉस्पिटल सध्या हमासच्या दहशतवादी ऑपरेशनचे मुख्य तळ बनले आहे. अशा प्रकारे गाझामध्ये अनेक ठिकाणी रुग्णालयांभोवती लष्करी तळ उभारण्यात आले आहेत. ही सर्व बोगस रुग्णालये असून, दहशतवाद्यांना इस्रायलच्या माऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हमासने हा कुटील डाव आखला आहे. या ठिकाणांवर इस्रालयने हल्ला केला, तर आमच्या रुग्णालयांवर (रेड क्रॉस) हल्ला केल्याची मानवी ढाल पुढे करून आंतरराष्ट्रीय पातळीवर सहानुभूती मिळवण्याचा दुष्ट हेतू हमासच्या मनात आहे. परंतु, इस्रायलच्या संरक्षण विभागाने यासंबंधीचे व्हिडिओ आणि फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करीत त्यांना उघडे पाडले आहे. त्यामुळे हमासप्रती सहानुभूती व्यक्त करणाऱ्या राष्ट्रांनी या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेचा कुटील डाव ओळखावा आणि जगावर घोंगावणाऱ्या दहशतवादी संकटाला मूठमाती द्यावी. (Israel Hamas War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.