Manoj Jarange : मला माफ करा; मनोज जरांगे यांनी का मागितली माफी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशीही मनोज जरांगे यांनी पाणी आणि उपचार घेण्याची विनंती नाकारली आहे.

343
Manoj Jarange : मला माफ करा; मनोज जरांगे यांनी का मागितली माफी
Manoj Jarange : मला माफ करा; मनोज जरांगे यांनी का मागितली माफी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (Manoj Jarange) २९ ऑक्टोबर रोजी त्यांचा उपोषणाचा आता ५ वा दिवस आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशीही मनोज जरांगे यांनी पाणी आणि उपचार घेण्याची विनंती नाकारली आहे.

सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी देऊनही निर्णय न झाल्याने जरांगेंनी हा निर्णय घेतला. मनोज जरांगे म्हणाले, “गावातील लोकांच्या चुली पेटत नाहीत आणि तेही जेवण करत नाहीत. तुम्ही पाणी आणि उपचार घ्या, अशी चिट्ठी लिहून मला संदेश देण्यात आला. मी कधीच या गादीला नाही म्हटलेलो नाही. परंतु गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केले आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतो आहे.” (Manoj Jarange)

(हेही वाचा – Maratha Reservation : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; मराठा आरक्षणाला ‘असे’ दिले समर्थन)

“गादीने मराठा समाजाच्या कल्याणासाठी कधीही माघार घेतलेली नाही. मी ही समाजाच्या कल्याणासाठी माघार घेणार नाही. मी गादीचा शब्द कधीही खाली पडून दिला नाही. मात्र, माझा नाईलाज आहे. समाजाच्या कल्याणासाठी, समाजाला न्याय मिळावी म्हणून मला ही कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. मराठ्यांची लेकरंबाळं फार तरसली आहेत. त्यामुळे गड्यांनो मला माफ करा,” अशी भावना मनोज जरांगे यांनी व्यक्त केली. (Manoj Jarange)

उपचार घेऊ शकत नाही

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “यात तुमचेच मराठ्यांची लेकरं आहेत. त्या लेकरांसाठी गड्यांनो मला माफ करा. मी पाणी उपचार घेऊ शकत नाही. कारण माझ्या लेकरांच्या काय वेदना आहेत या सरकारने ओळखल्या पाहिजेत. सरकारने यावर तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा.”

मनोज जरांगे पुढे बोलतांना म्हणाले, “समाजाने खूप वेदना सहन केल्या आहेत. मराठा जातीवर खूप अन्याय झाला आहे. आता अन्याय होऊ द्यायचा नाही. म्हणून ही लढाई आहे. इथे माझा हेकेखोरपणा नाही, आडमुठेपणाही नाही. माझ्या जातीवर अन्याय झाला आहे. मला थांबता येणार नाही.”  (Manoj Jarange)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.