इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यातील युद्धाची धुमश्चक्री दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र याचा जगभरातील बाजारपेठांवर परिणाम होताना दिसत आहे. भारतीय शेअर बाजारात सलग दुसरा आठवड्यात सेंसेक्सच्या टॉप-१० कंपन्या तोट्यात आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची कोट्यवधींची संपत्ती बुडाली.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या (BSE Sensex) ३० शेअर्सच्या सेक्सेनमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल गेल्या आठवड्यात १.९३ लाख कोटी रुपयांनी घसरले. या यादीत समाविष्ट असलेल्या टाटा समूहाच्या आयटी कंपनी टीसीएसच्या गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
सेन्सेक्सच्या टॉप-१० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये (Market Cap)गेल्या आठवड्यात १, ९३,१८१.१५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. BSE सेन्सेक्स 1,614.82 अंकांनी किंवा 2.46 टक्क्यांनी घसरला. या कालावधीत शेअर बाजारातील तोट्यामुळे टाटा समुहाच्या टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचे बाजार भांडवल (TCS MCap) 12,25,983.46 कोटी रुपयांवर घसरले.
(हेही वाचा – Manoj Jarange : मला माफ करा; मनोज जरांगे यांनी का मागितली माफी)
TCS गुंतवणूकदारांनी ट्रेडिंगच्या एका आठवड्यात 52,580.57 कोटी रुपयांची मालमत्ता गमावली. यामुळे गेल्या आठवड्यातही टीसीएस गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते आणि कंपनीचे मार्केट कॅप 27,827.08 कोटी रुपयांनी घसरून 12,78,564.03 कोटी रुपयांवर आले होते.
एचडीएफसी-रिलायन्सलाही तोटा
या कालावधीत टीसीएसनंतर मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसाना झालं आहे. एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅपिटलायझेशन ४०,५६२.७१ कोटी रुपयांवरून घसरले. त्यामुळे RIL MCap मध्ये २२ कोटी रुपयांची घट होऊन १५ कोटी रुपयांवर आली.