Maratha Reservation : मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, योग्य निर्णयासाठी प्रयत्न सुरू आहेत; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

पाचव्या दिवशी सकाळी पाटील यांची प्रकृती खालावलेली दिसून आली.

171
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, योग्य निर्णयासाठी प्रयत्न सुरू आहेत; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, योग्य निर्णयासाठी प्रयत्न सुरू आहेत; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करणारे जरांगे पाटील  यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून उपचार घेण्यास नकार दिला आहे. अन्न, पाणी त्याग करून आमरण उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. मला बोलता येते, तोपर्यंत तुम्ही चर्चेला या, आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा, असे ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी सकाळी पाटील यांची प्रकृती खालावलेली दिसून आली. जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांना निटसे बोलताही येत नव्हते.

(हेही वाचा – Manoj Jarange : मला माफ करा; मनोज जरांगे यांनी का मागितली माफी)

जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा बांधवांनी एकजूट व्हावे. फुटू देऊ नये. महाराष्ट्रात जिथे जिथे साखळी उपोषण आहे तिथे आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात परवानगीचा अर्ज द्यावा. जेणेकरून सरकारला किती ठिकाणी उपोषण सुरू आहे, हे समजेल. यावेळी आत्महत्या, उग्र आंदोलन करू नकास, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून अद्याप प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेऊ. बोलायला त्रास होत असून जास्त बोलू शकत नसल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे असल्याचे सांगितले. डॉक्टरांचे पथक त्यांच्यासोबत असून त्यांचा जीव महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले तसेच मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री स्वत: यामध्ये लक्ष घालत आहेत. जो योग्य निर्णय असेल तो घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला वाटतं जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.