पुण्याजवळ मांजरी येथे बेल्हेकर वस्तीमधील एका गोडाऊनमधे २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.२३ वाजता आग लागल्याची घटना घडली. (Gas Cylinders Explode) शिवतेज गॅस सेल्स सर्व्हिसेस या पञ्याचे शेड असलेल्या गॅस गोडाउनमधे आग लागली. सदर ठिकाणी सहा छोटे सिलेंडर फुटून आगीचा भडका उठला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेऊन वीस मिनिटात आग नियंत्रणात आणली. (Gas Cylinders Explode)
(हेही वाचा – High Alert in Mumbai : मुंबईत हायअलर्ट; केरळमधील बॉम्बस्फोटांनंतर का वाढवली छाबड हाउसची सुरक्षा ?)
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा करून संभाव्य हानी टळली. मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या गॅस सिलेंडरमधे गॅस भरतांना आग लागल्याचे समजले. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग विझवत धोका दूर केला.
हे गॅस रिफिलिंग सेंटर कायदेशीर परवानगीने चालवले जात होते कि बेकायदेशीर होते, याचा तपास चालू आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये गॅस रिफिलिंग करताना काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ताथवडे परिसरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करतांना एकापाठोपाठ एक नऊ गॅस सिलेंडर फुटल्याने भीषण स्फोट झाले होते, तसेच गॅस पसरल्याने जवळच पार्क केलेल्या तीन ते चार स्कूल बस यात जळून खाक झाल्या होत्या. (Gas Cylinders Explode)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community