ऋजुता लुकतुके
या विश्वचषकात भारतीय संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत स्पर्धेतला आपला सलग सहावा विजय साकार केला आहे. आणि एरवी गोलंदाजांनी गाजवलेल्या या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला तो रोहित शर्माला(Rohit Sharma Record). त्याच्या ८७ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघ दोनशेची मजल मारू शकला.
या खेळीबरोबरच रोहित शर्माने क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा मापदंड ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या १८,००० धावा पूर्ण झाल्या आहेत. आणि ही कामगिरी करणारा तो फक्त पाचवा भारतीय आहे. या यादीतील इतर चार फलंदाज आहेत सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड.
एकूण ४५७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहितने आता १८,०४० धावा (Rohit Sharma Record) जमवल्या आहेत. त्याची सरासरी आहे ४३.५७ आणि स्ट्राईकरेट आहे ८६.४१ चा. यात त्याने ४५ शतकं आणि ९९ अर्धशतकं ठोकली आहेत. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे २६४ धावांची. आणि एकदिवसीय क्रिकेटमधील हा एक विक्रम आहे.
Milestone Unlocked 🔓
1⃣8⃣,0⃣0⃣0⃣ international runs & counting for #TeamIndia Captain Rohit Sharma 👏👏#CWC23 | #MenInBlue | #INDvENG pic.twitter.com/zV5pvstagT
— BCCI (@BCCI) October 29, 2023
विराटने कसोटी क्रिकेटच्या तुलनेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण धावा केल्या आहेत. एकूण २५७ एकदिवसीय सामन्यांत त्याने १०,५१० धावा केल्या आहेत. आणि त्याची सरासरी आहे ४९.५७ धावांची. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ३१ शतकं ठोकली आहेत.
रोहित १४८ टी-२० सामनेही भारतासाठी खेळला आहे. आणि यात त्याने ३,८५३ धावा केल्या आहेत त्या १३९ च्या स्ट्राईकरेटने. टी-२० क्रिकेटमध्ये जगात सगळ्यात जास्त धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय धावांमध्ये सचिन तेंडुलकर ३४,३५७ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. ६६४ सामन्यांमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. सचिन हा एकमेव फलंदाज असा आहे ज्याच्या नावावर १०० आंतरराष्ट्रीय शतकं जमा आहेत. सचिननंतर विराट कोहली या आणखी एका भारतीयाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५,००० च्या वर धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर २६,००० धावा जमा आहेत. आताच्या विश्वचषकाबद्दल बोलायचं झालं तर रोहितने ६ सामन्यांमध्ये ३९८ धावा केल्या आहेत त्या ६६ च्या सरासरीने.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community