Virat Meets Raina : एकाना स्टेडिअमवर विराटने घेतली माजी संघ सहकारी सुरेश रैनाची गळाभेट 

भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानच्या सामन्यात मध्यंतराला प्रेक्षकांना एक छान दृश्य पाहायला मिळालं. विराट कोहली आणि त्याचा जुना संघ सहकारी सुरैश रैना यांची अचानक मैदानावर भेट झाली. दोघांनी गळामिठी मारून हा क्षण साजरा केला. 

205
Virat Meets Raina : एकाना स्टेडिअमवर विराटने घेतली माजी संघ सहकारी सुरेश रैनाची गळाभेट 
Virat Meets Raina : एकाना स्टेडिअमवर विराटने घेतली माजी संघ सहकारी सुरेश रैनाची गळाभेट 

ऋजुता लुकतुके

भारत आणि इंग्लंड लढतीच्या मध्यंतराला एक छान प्रसंग एकाना स्टेडिअमवर घडला. भारताची गोलंदाजी सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी आणि वॉर्म-अप म्हणून विराट कोहली (Virat Meets Raina) मैदानावर उतरला. आणि तिथे सामन्याविषयी तज्जांमधील चर्चा करण्यासाठी आला होता त्याचा माजी सहकारी सुरेश रैना. दोघंही २०११ च्या विश्वचषक विजयाचे साक्षीदार आहेत. त्यामुळे ही भेट आणखी विशेष होती.

त्यावेळी टीव्ही प्रसारण सुरू असल्यामुळे अनेकांना ही भेट लाईव्हही पाहता आली. विराट आणि सुरेश रैना यांनी उत्सुर्तपणे एकमेकांना मिठी मारली. आणि दोघांमध्ये काही क्षण गप्पाही झाल्या. सुरेश रैनाला पाहताच विराटच्या चेहऱ्यावर हसू उमललं. (Virat Meets Raina)

(हेही वाचा-Pollution In Mumbai : प्रदूषणाविरोधात मुंबईकरांची साईन द पिटिशन मोहीम)

सुरेश रैना उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादपूरचा राहणारा आहे. रविवारचा सामना लखनौमध्ये असल्यामुळे आयसीसीने या भागातील क्रिकेटपटूंना खास आमंत्रण दिलं होतं. सामन्यापूर्वी स्पर्धेचा चषक मैदानात स्थानापन्न करण्याचा मान आज महम्मद कैफ आणि सुरेश रैना या दोन माजी उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनाच मिळाला. त्या निमित्ताने सुरेश रैना मैदानावर आला होता.

विराटसाठी आजचा दिवस मैदानावर मात्र फारसा चांगला नव्हता. फलंदाजी करताना ९ चेंडू खेळून काढल्यावर तो भोपळाही न फोडता माघारी परतला. विश्वचषक स्पर्धेत ५६ डावांनंतर शून्यावर बाद होण्याची विराटची ही पहिलीच वेळ. डेव्हिड विलीच्या उंची दिलेल्या चेंडूवर विराट खराब फटका मारून बाद झाला. आणि त्यानंतर भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण असताना विराटने जो रुटचा एक अवघड झेलही टाकला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.