DRS Controversy : तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर जो रुट नाराज, डीआरएसवरून पुन्हा वाद 

या स्पर्धेत पुन्हा एकदा डीआरएस प्रणालीवरून पंचांनी दिलेल्या निर्णयावर फलंदाजाने नापसंती व्यक्त केली आहे. भारत वि. इंग्लंड सामन्यात असं काय घडलं पाहूया…

187
DRS Controversy : तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर जो रुट नाराज, डीआरएसवरून पुन्हा वाद 
DRS Controversy : तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर जो रुट नाराज, डीआरएसवरून पुन्हा वाद 

ऋजुता लुकतुके

या विश्वचषक स्पर्धेत डीआरएस (DRS Controversy) म्हणजेच डिसिजन रिव्ह्यू प्रणाली पुन्हा एकदा वादात सापडली आहे. इंग्लिश कर्णधार जो रुटने त्याला पायचीत दिलं गेल्यावर या प्रणालीची मदत घेतली होती. मैदानावरील पंचांनी दिलेला धावबाद, पायचीत किंवा झेलबाद अशा निर्णयांविरुद्ध तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याची मुभा संघांना आहे. एका डावात प्रत्येक संघ दोनदा असा रिव्ह्यू घेऊ शकतो.

तिसरे पंच मग टिव्हीवर चित्रिकरण पाहून नेमकं काय घडलं याचा शहानिशा करून पुन्हा निर्णय देतात. मैदानावरील पंचांचा निर्णय फिरवण्याचा अधिकार तिसऱ्या पंचांना आहे. आज भारत वि. इंग्लंड सामन्यात १ बाद ३० या धावसंख्येवर जो रुट फलंदाजीसाठी आला. जसप्रीत बुमराच्या पुढच्याच चेंडूवर भारतीयांनी पायचीतचं अपील केलं. आणि मैदानावरील पंचांनी त्याला बादही दिलं.

जो रुटने तिसऱ्या पंचांची मदत मागितली. थोडक्यात. डीआरएस प्रणालीची (DRS Controversy) मदत घेतली. या प्रणालीत तिसरे पंच तीन गोष्टी बघतात. एक चेंडू नोबॉल नाही ना. मग चेंडू बॅटची कड घेऊन गेला नाही ना. आणि मग तो खरंच बाद आहे का. या प्रसंगी चेंडू बॅटची ओझरती कड घेऊन गेलेला दिसला. तसं अल्ट्राएज हे यंत्र अगदी सुस्पष्टपणे नाही तरी हलकी कड घेतल्याचं दर्शवत होतं. खालील व्हीडिओत तुम्ही अल्ट्राएजचं विश्लेषण पाहू शकता.

जे रुटने बाद दिलं गेल्यावर मैदानातच आपली नाराजी व्यक्त केली. स्क्वेअर लेगवर असलेल्या पंचांना बघून त्याने निर्णयावर विश्वास बसत नसल्याचं दाखवलं. बुमराने जो रुटचा बळी टिपल्यावर पुढच्या ९ धावांतच आणखी ४ इंग्लिश फलंदाज बाद झाले. आणि भारताने या सामन्यावर वर्चस्व मिळवलं.

या स्पर्धेत आतापर्यंत दुसऱ्यांदा डीआरएस प्रणाली आणि तिसऱ्या पंचांचे निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. यापूर्वी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानच्या सामन्यात आफ्रिकन फलंदाज व्हॅन देअर डयुसेनला मैदानातील पंचांनी बाद दिलं. त्याने डीआरएसची मदत घेतल्यावर सुरुवातीला जो रिप्ले टिव्हीवर दाखवण्यात आला त्यात चेंडू लेगसाईडला जात असताना दिसला. म्हणजेच फलंदाज बाद नव्हता.

पण, अचानक यंत्राची मदत घेतल्यावर चेंडू लेगस्टंपला लागलेला दिसला. आणि तिसऱ्या पंचांनी व्हॅन देअर डयुसेनला बाद दिलं. ड्‌युसेनसाठी हा धक्काच होता. आणि त्याने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांनाही डीआरएस प्रणालीचा विचित्र अनुभव या स्पर्धेत आला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.