Hardik Pandya Injury Update : हार्दिक भारतीय संघाबरोबर मुंबईत, श्रीलंकेविरुद्ध खेळणार का?

जखमी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाबरोबरच मुंबईत दाखल होणार आहे. पण, संघ समावेशाबद्दल अजून कुणीही अधिकृतपणे काही सांगितलेलं नाही

205
Hardik Pandya Injury Update : हार्दिक भारतीय संघाबरोबर मुंबईत, श्रीलंकेविरुद्ध खेळणार का?
Hardik Pandya Injury Update : हार्दिक भारतीय संघाबरोबर मुंबईत, श्रीलंकेविरुद्ध खेळणार का?
  • ऋजुता लुकतुके

जखमी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाबरोबरच मुंबईत दाखल होणार आहे. पण, संघ समावेशाबद्दल अजून कुणीही अधिकृतपणे काही सांगितलेलं नाही. (Hardik Pandya Injury Update)

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या दुखापतीबद्दल एक महत्त्वाचा अपडेट आला आहे. दहा दिवसांपेक्षा जास्त राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेतल्यानंतर अखेर हार्दिक मुंबईत भारतीय संघात सामील होणार आहे. पण, भारताचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध २ नोव्हेंबरला आहे. तोपर्यंत हार्दिक खेळण्या इतका तंदुरुस्त होईल का हे अजून सांगता येत नाही. (Hardik Pandya Injury Update)

हार्दिकला बांगलादेश विरुद्धच्या सामन्या दरम्यान पुण्यात १९ ऑक्टोबरला दुखापत झाली होती. चेंडू टाकल्यानंतरच्या फॉलो-थ्रूमध्ये त्याचा घोटा दुखावला होता. तेव्हापासून बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तो उपचार घेत होता. त्याच्यासाठी लंडनहून तज्ञांनाही बोलावण्यात आलं होतं. अगदी रविवारपर्यंत हार्दिकने नेट्समध्येही गोलंदाजी केली नव्हती. (Hardik Pandya Injury Update)

(हेही वाचा – Fire News : बेंगळुरूमधील वीरभद्र नगरजवळ भीषण आग, १० बस जळून खाक)

पण, आता त्याचा घोटा बरा झालाय. त्यामुळे त्याला बंगळुरूहून डिस्चार्ज मिळणार आहे आणि तिथून तो थेट मुंबईत भारतीय संघात सामील होईल, असं सांगण्यात येतंय. ‘हार्दिक मुंबईत येतोय हे खरं आहे. फक्त श्रीलंकेविरुद्ध तो इतक्यात खेळेल का हे सांगता येत नाही. बंगळुरूहून आलेलं तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र आणि इथं संघ प्रशासन काय निर्णय घेतं यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. (Hardik Pandya Injury Update)

बांगलादेश विरुद्ध झालेल्या दुखापतीनंतर हार्दिक न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यांत खेळलेला नाही. त्याच्या जागी संघ प्रशासनाने ५ तज्ञ गोलंदाज आणि ६ फलंदाजांना घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामी यांना या दोनही सामन्यात संधी देण्यात आली. मोहम्मद शामीने या संधीचं सोनं करताना दोन सामन्यांत ८ बळी मिळवले आहेत. तर सुर्यकुमारही न्यूझीलंड विरुद्ध २ धावांवर धावचीत झाल्यानंतर इंग्लंड विरुद्ध ४९ धावांची उपयुक्त खेळी खेळला आहे. (Hardik Pandya Injury Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.