मराठा आंदोलक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी तीव्र आंदोलन सुरु आहे. (Maratha Reservation) राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. ३० ऑक्टोबर रोजी अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला काळे फासले. तेही पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतच ही घटना घडली. या वेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. (Maratha Reservation)
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे हे आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या काही तरुणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला काळे फासले. या वेळी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. बारामती-निरा रस्त्यावर लावलेल्या एका फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरील बाजूस फोटो होता. संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी त्याला काळे फसले. (Maratha Reservation)
(हेही वाचा – Neelam Gorhe : उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत, निलम गोऱ्हे यांचे निर्देश)
दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या रोषामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील गळीत हंगामासाठीचा दौरा रद्द करावा लागला होता. यानंतर आंदोलन अधिक तीव्र होत असल्याने आता परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाऊ लागली आहे.
आमदार प्रदीप सोळुंके यांचे घर पेटवले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातही आंदोलक आक्रमक झाले आहेत. माजलगाव येथे आमदार प्रदीप सोळुंके यांचे घर पेटवून देण्यात आले आहेत. तसेच जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये जाळपोळ केली. आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसून जाळपोळ केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली. बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड त्यासोबतच धुळे-सोलापूर आणि त्यानंतर आता कल्याण विशाखापटणम् महामार्गावरही आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चौकांमध्ये रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community