क्रिकेट वर्ल्डकपचे सामने सुरू असल्याने सध्या जगभरातून चाहते भारतात येत आहेत, असे असले तरीही मराठा आंदोलन (Maratha Reservation) चिघळल्याने त्याचे पडसाद जगभरात उमटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुण्यातील स्टेडियममध्ये श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान वर्ल्ड कप सामना सुरू आहे. सामना पाहायला येणाऱ्या चाहत्यांपैकी अनेक चाहते काळे कपडे परिधान करून आले होते. यावेळी मराठा आंदोलनाचं कारण देत या प्रेक्षकांना पोलिसांनी स्टेडियममध्ये जाण्यापासून अडवलं. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict : हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलला सापडलं नवं हत्यार, कोणतं? वाचा सविस्तर…)
राज्यात मराठा आंदोलन प्रचंड चिघळलं असून अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. यामुळेच सगळीकडे खळबळ उडाली आहे. याचा परिणाम म्हणून पुण्यात काळे कपडे घालून वर्ल्ड कप सामना पाहायला आलेल्यांची पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद वर्ल्डकप सामन्यात उमटू नयेत, म्हणून पोलीस यंत्रणांनी ही खबरदारी घेतली आहे.
पुण्यात श्रीलंका-अफगाणिस्तान सामन्यानंतर आणखी तीन सामने होणार आहेत. पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचं आम्ही पालन करू, मात्र त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
हेही पहा –