जय कवळी आणि नामदेव शिरगावकर यांचा ‘महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन’ची बैठक उधळण्याचा डाव

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांची मदत घेतली आहे

134
जय कवळी आणि नामदेव शिरगावकर यांचा 'महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन'ची बैठक उधळण्याचा डाव
जय कवळी आणि नामदेव शिरगावकर यांचा 'महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन'ची बैठक उधळण्याचा डाव

जागतिक पातळीवरचे मुष्ठियोद्धे घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन’ची विशेष सर्वसाधारण सभा उधळण्याचा डाव राज्यातील काही अवैध संघटनांच्या प्रतिनिधींनी आखला आहे. जय कवळी आणि नामदेव शिरगावकर अशी त्यांची नावे असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन’ने केली आहे.

‘महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन’ची विशेष सर्वसाधारण सभा ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत होऊ घातली आहे, मात्र जय कवळी आणि नामदेव शिरगावकर यांनी संघटनेच्या सभासदांना बेकायदेशीररित्या ई-मेल पाठवून बैठकीला न जाण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक या दोघांनाही ‘महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन’च्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कवळी हे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष होते; मात्र त्यांना भारतीय बॉक्सिंग असोसिएशनने निलंबित केल्यानंतर संघटनेने रणजित सावरकर यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड केली होती.

विद्यमान कार्यकारिणीचा कालावधी संपल्यानंतर नवीन निवडणुका घेण्यासाठी १९ जानेवारीला नागपूरमध्ये विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, जय कवळी गटाच्या सदस्यांनी ती उधळून लावली. तेव्हापासून निवडणूक होऊ न देण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. आता ३१ ऑक्टोबरला होणारी बैठक उधळण्याचा डावही त्यांनी आखला आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांची मदत घेतली आहे. शिरगावकर यांच्या माध्यमातून त्यांनी ही बैठक न घेण्याचे निर्देश पाठवले आहेत. परंतु, हे निर्देश पूर्णतः बेकायदेशीर आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन ही संघटना मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० अंतर्गत नोंदणीकृत असून, संघटनेच्या अंतर्गत कामात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ढवळाढवळ करू शकत नाही, अशी माहिती ‘महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन’चे महासचिव राकेश तिवारी यांनी दिली.

…तर संघटनेची संलग्नता रद्द होणार – रणजित सावरकर

विद्यमान कार्यकारिणीचा कालावधी संपल्यानंतर संघटनेची निवडणूक घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आधी सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा (एसजीएम) घ्यावी लागेल. एसजीएम झाली नाही, तर निवडणूक कशी घेणार? निवडणूक झाली नाही तर भारतीय बॉक्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची संलग्नता रद्द करेल. त्यामुळे महाराष्ट्रातील मुष्टियोद्ध्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे राज्यातील मुष्टियोद्ध्यांचे नुकसान करण्याचा कट आखणाऱ्या जय कवळी आणि नामदेव शिरगावकर यांच्यावर महाराष्ट्र ऑलम्पिकक संघटनेने कारवाई करावी.
– रणजित सावरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन

कारवाई करा – राकेश तिवारी

‘महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन’च्या सदस्य जिल्ह्यांनी मागणी केल्यानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसाधारण सभा संघटनेसाठी सर्वोच्च असुन संघटनेचे कायदे बदलू शकते, इतकेच काय तर संघटना बरखास्त करण्याचे अधिकार देखील तिला आहेत. अशावेळी निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी संघटनेची बैठक होत असेल, तर ती नीट पार पडणे आवश्यक आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला सचिवांना कुठलीही खातरजमा न करता अशा प्रकारचे ई-मेल पाठवण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण ही मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार स्थापन झालेली स्वतंत्र संघटना आहे. संघटनेची निवडणूक होऊ न देण्यासाठी त्यांच्याकडून बेकायदेशीर दबावाचा अवलंब केला जात आहे. नामदेव शिरगावकर हे ‘इंडिया तायक्वांदो’ या संघटनेचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, या संघटनेला भारतीय ऑलम्पिक असोसिएशनची मान्यता नाही. तरीही त्यांनी बेकायदेशीररित्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएन मध्ये शिरकाव केला आहे. दुसरीकडे जय कवळी यांना भारतीय बॉक्सिंग असोसिएशनने निलंबित करूनही ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष पद भूषवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी.

– राकेश तिवारी, महासचिव, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.