सध्या वातावरणात प्रचंड प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते एप्रिल-मे हे दोन महिने प्रचंड उष्णतेचे असणार आहेत. २०२१ हे वर्ष तर सर्वाधिक तापमानाचे ठरणार आहे. अशा वेळी अनेकजण रासायनिक थंड पेयाच्या आहारी जातात आणि आरोग्यस्वास्थ्य गमावून बसतात. त्यांनी वेळीच सवय बदलून नैसर्गिक उपायांकडे स्वतःला झोकून द्यावे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यामुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. एकाच ठिकाणी १०-१० तास बसून राहावे लागत आहे. त्यामुळेही उष्णता वाढते, वजन वाढते. सब्जाच्या बिया नेमक्या यावर फलदायी ठरतात. कोणते गुण आहेत या बियांमध्ये समजून घेऊया!
तुळस भारतीय घरांतील पूजनीय झाड आहे. अनेक घरांमध्ये तुळशीचे रोपटे लावलेले पाहायला मिळते. तुळस अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते. तुळशीचे बी म्हणजेच सब्जा शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचे सेवन केल्याने शरीरात होत असलेला दाह कमी करण्यास मदत होते. सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते.
वजन कमी करते!
सब्जा वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
(हेही वाचा : या विदेशी व्हॅक्सिन लवकरच येणार भारतात… काय आहे त्यांची किंमत? किती आहेत प्रभावी? वाचा…)
बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करते!
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन आतड्यांचे कार्य चांगले ठेवते. गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ, अॅसिडिटी कमी करण्यासही मदत होते.
त्वचा तजेलदार होते!
प्रदूषणामुळे त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. परंतु सब्जा त्वचेला ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज करा. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
केसांसाठी फायदेशीर आहे!
प्रदूषणामुळे केस निर्जीव होतात. सब्जात असणारी विटॅमिन, लोह, प्रोटिन अशी पोषक द्रव्ये केसांसाठी उपयोगी ठरतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.
या आजारांवर गुणकारी
मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा फायदेशीर ठरतो. सब्जाच्या सेवनाने उत्साही वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड राहते. सब्जाच्या सेवन केल्याने खाल्यानंतर पोटात अॅसिडिसी कमी होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन दूर होतात. त्यामुळे अनेक छोट्या-छोट्या समस्या कमी होतात. तसेच शरीराला एनर्जीही मिळते.
Join Our WhatsApp Community