Ind vs Sl Suryakumar Yadav : फॉर्म हरवलेला श्रेयस अय्यरची जागा सुर्यकुमार यादवला मिळणार का?

भारत आणि श्रीलंके दरम्यानच्या सामन्यात हार्दिक खेळण्याची शक्यता कमीच आहे.

121
Ind vs Sl Suryakumar Yadav : फॉर्म हरवलेला श्रेयस अय्यरची जागा सुर्यकुमार यादवला मिळणार का?

ऋजुता लुकतुके

सुर्यकुमार यादव (Ind vs Sl Suryakumar Yadav) या मुंबईकर फलंदाजाला SKY म्हणजेच स्काय असं संबोधलं जातं. या नावात आणि त्याच्या खेळण्याच्या शैलीत आणखी एक साम्य आहे. तो चौफेर पसरलेल्या आकाशाप्रमाणेच कुठल्याही दिशेला हमखास षटकार मारु शकतो. १८० अंशात कुठेही तो चेंडू भिरकावून देऊ शकतो.

ही त्याची शैली टी-२० क्रिकेटमध्ये जास्त लोकप्रिय आणि यशस्वी ठरलीय. एरवी भारतीय एकदिवसीय संघात आधीच शैलीदार फलंदाजांचा भरणा असल्यामुळे एकदिवसीय क्रिकेटसाठी आतापर्यंत सुर्यकुमारचा (Ind vs Sl Suryakumar Yadav) विचारही झाला नव्हता. पण, विंडिज दौऱ्यावरच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर त्याची या एकदिवसीय विश्वचषकासाठी निवड झाली.

हार्दिक जायबंदी झाल्यावर त्याला (Ind vs Sl Suryakumar Yadav) संघातही स्थान मिळालं. आणि इंग्लंड विरुद्ध संघाला गरज असताना ४९ धावांची खेळी करून त्याने आपली उपयुक्तताही सिद्ध केली आहे. एकाना स्टेडिअमची खेळपट्टी आव्हानात्मक होती. अशा खेळपट्टीवर चिवट आणि वेळेनुरुप फलंदाजी करत त्याने ४७ चेंडूत ४९ धावा केल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे संघाला २३० धावांच्या जवळ नेलं.

त्याच्या या खेळीमुळे चौथ्या क्रमांकाचा फलंदाज श्रेयस अय्यरचं अपयश आणखी उठून दिसू लागलं आहे. कारण, श्रेयसने आतापर्यंत या स्पर्धेत मोठी खेळी रचलेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर त्याने २५,५३, १९, ३३ आणि ४ अशा धावा केल्या आहेत. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी कर्णधार रोहीत शर्माने संघाला चौथ्या क्रमांकावर खेळणारा जबाबदार फलंदाज हवा असल्याची गरज वारंवार व्यक्त केली होती. त्यासाठीच श्रेयसची संघात निवड झाली. (Ind vs Sl Suryakumar Yadav)

(हेही वाचा – Ind vs Sl : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल)

पण, पाठीच्या दुखापतीतून उठलेला श्रेयस नेमकी तीच भूमिका वठवू शकलेला नाही. डावाच्या सुरुवातीला येऊन संपूर्ण डाव खेळून काढण्याची अपेक्षा श्रेयसकडून आहे. पण, नेमका तिथेच तो आतापर्यंत कमी पडलाय. त्यामुळे आता हार्दिक परत आला तरी श्रेयसला नारळ देऊन संघात (Ind vs Sl Suryakumar Yadav) सुर्यकुमार किंवा ईशान किशनच्या समावेशाची मागणी होत आहे.

सुर्यकुमार (Ind vs Sl Suryakumar Yadav) एकेरी – दुहेरी धावा घेऊन धावफलक हलता ठेवण्यात कमी पडतो, असं प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं मत होतं. म्हणूनच त्यांनी सुर्यकुमार टी-२० तज्ज असल्याचं विधान केलं होतं. पण, आता इंग्लंड विरुद्धची त्याची खेळी पुरेशी बोलकी होती. त्यामुळे सुर्यकुमारच्या संघात समावेशाची मागणी आता सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

अर्थात, याविषयी रोहीत शर्मा किंवा राहुल द्रविड यांनी अधिकृतपणे कुठलंही विधान केलेलं नाही. श्रेयसबरोबरच आणखी एका भारतीय खेळाडूवर टीका होतेय तो म्हणजे महम्मद सिराज. मोक्याच्या जागी बळी टिपण्याची हातोटी त्याच्याकडे आहे. पण, सुरुवातीला तो खूप जास्त धावा देतोय. म्हणून त्याच्या जागीही शार्दूल ठाकूर किंवा रवी अश्विनच्या नावाची चर्चा होत आहे. (Ind vs Sl Suryakumar Yadav)

भारतीय संघाने उपान्त्य फेरी गाठल्यात जमा आहे. त्यामुळे सर्वांना संधी देण्याच्या हेतूनेही श्रीलंकेविरुद्ध काही बदल भारतीय संघ करू शकतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.