Aadhaar Data Leak : तब्बल 81.5 कोटी भारतीयांची आधार माहिती चोरीला

199
Aadhaar Data Leak : तब्बल 81.5 कोटी भारतीयांची आधार माहिती चोरीला

अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी फर्मच्या एका अहवालात (Aadhaar Data Leak) असा दावा करण्यात आला आहे की सुमारे 815 दशलक्ष म्हणजे 81.5 कोटी भारतीयांचा आधार कार्ड आणि पासपोर्ट संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे.

अहवालानुसार, नाव, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, आधार, पासपोर्टची माहिती ऑनलाइन विक्रीसाठी आहे.

अमेरिकन फर्मने (Aadhaar Data Leak) आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 9 ऑक्टोबर रोजी ‘pwn0001’ या व्यक्तीने ब्रीच फोरमवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये 81.5 कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती देण्यात आली आणि हा डेटा विकण्याचा प्रयत्न केला गेला. सुरक्षा अहवालानुसार, संबंधित व्यक्तीने आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती 80 हजार डॉलरमध्ये विकण्याची ऑफर दिली होती. (Aadhaar Data Leak)

(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी)

मीडिया रिपोर्टनुसार, लीक झालेला (Aadhaar Data Leak) डेटा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडील असू शकतो. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, ICMR ने अद्याप यासंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. pwn0001 द्वारे शोधलेल्या या डेटा लीकची सीबीआय चौकशी करत असल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे.

याआधी, ऑगस्ट महिन्यामध्ये लुसियस नावाच्या आणखी एका व्यक्तीने ब्रीच फोरमवर 1.8 टेराबाइट डेटा विकण्याची ऑफर दिली होती. तर जूनमध्ये, CoWin वेबसाइटवरून VVIP सह लसीकरण झालेल्या नागरिकांचा वैयक्तिक डेटा टेलिग्राम मेसेंजर चॅनेलद्वारे कथितपणे लीक झाल्यानंतर सरकारने तपास सुरू केला होता. (Aadhaar Data Leak)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.