दुसऱ्या पोलीस ठाण्याची हद्द असल्याचे कारण पुढे करून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालक कार्यालय (DGP) कडून ‘स्ट्रिकली वॉर्निंग’ देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने नुकतेच राज्यभरातील सर्व युनिट प्रमुखांना परिपत्रक जारी करून घटनास्थळ त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसले तरी गुन्हा नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः महिला तक्रारदाराचे गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करू नये. मुंबई पोलीस कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे या परिपत्रकात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (DGP)
(हेही वाचा – Mumbai Crime : एक प्रेयसी दोन प्रियकर!, ‘ती’ला मिळवण्यासाठी दोघे भररस्त्यात भिडले)
महाराष्ट्र पोलिसांचे विशेष महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांच्या स्वाक्षरीने २६ ऑक्टोबर रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आले. पोलिस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी ११ फेब्रुवारी २०१४, ७ ऑक्टोबर २०१५ आणि ४ डिसेंबर २०१९ रोजी आदेश जारी करण्यात आले होते. ज्यामध्ये पोलिस कर्मचार्यांना घटनास्थळ त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसतानाही पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले होते. हे गुन्हे शून्य एफआयआर (FIR) ने नोंदवून पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात यावा असे निर्देश पत्रकात देण्यात आहे. विशेषतः महिलांच्या तक्रारींना प्रथम प्राधान्य देऊन तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात यावा. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे या परिपत्रकात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे परिपत्रक राज्यातील सर्व पोलीस ठाणे, व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. (DGP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community