Preeti Dighe : मुंबई महापालिकेच्या शिरपेचात ताज

गौरा फॅशन क्लब तर्फे आयोजित अखिल महाराष्ट्र स्तरावरील मिस, मिसेस व मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्र प्रस्तुत सौंदर्य स्पर्धा-२०२३ च्या पाचव्या पर्वात घाटकोपर भटवाडी येथे राहणाऱ्या प्रीती दिघे यांनी 'मिसेस महाराष्ट्र' हा किताब मिळवला आहे.

529
Preeti Dighe : मुंबई महापालिकेच्या शिरपेचात ताज
Preeti Dighe : मुंबई महापालिकेच्या शिरपेचात ताज

गौरा फॅशन क्लब तर्फे आयोजित अखिल महाराष्ट्र स्तरावरील मिस, मिसेस व मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्र प्रस्तुत सौंदर्य स्पर्धा-२०२३ च्या पाचव्या पर्वात घाटकोपर भटवाडी येथे राहणाऱ्या प्रीती दिघे यांनी ‘मिसेस महाराष्ट्र’ हा किताब मिळवला आहे. प्रीती दिघे या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असून सध्या त्यात अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. (Preeti Dighe)

New Project 61 1

गौरा फॅशन क्लबच्या वतीने अखिल महाराष्ट्र स्तरावरील सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुण्यात मिस, मिसेस व मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्र २०२३ च्या पाचवे पूर्व पार पडले. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या स्पर्धेत मिस, मिसेस व मिस्टर या गटात विजेते, प्रथम आणि दृतीय क्रमांक काढण्यात आले. यात घाटकोपर भटवाडी येथे राहणाऱ्या प्रीती दिघे यांची मिसेस महाराष्ट्र या किताबा करता निवड झाली. त्या या स्पर्धेत विजेत्या ठरल्या. त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हा सुप्रिमो पुरस्कार व ५१ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी बऱ्याच दिवसांपासून मेहनत घेतलेली आहे. तसेच सौंदर्य स्पर्धेतील ग्लोविंग स्किन, बेस्ट शेफ ही पारितोषिके ही जिंकेलेली असल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. (Preeti Dighe)

New Project 62 1

(हेही वाचा – Maratha Reservation : उद्धव ठाकरे यांचे सर्व खासदारांना राजीनामा देण्याचे आवाहन; म्हणाले आम्ही तुमच्यासोबत…)

प्रीती दिघे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असून सध्या त्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) या विभागात कार्यरत आहे. याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त करत याबाबत घेतलेल्या मेहनतीची माहिती दिली. त्या सांगतात, काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी नामांकन झाल्यानंतर सौंदर्यासोबत अभ्यासावरही भर दिला. पुण्यात मागील पाच दिवसांपासून ही स्पर्धा सुरू होती, या अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. दरदिवशी नवीन टास्क असायचा. त्यातून बेस्ट १५ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न उत्तरे आदींच्या मधून टॉप ३ निवड करण्यात आली होती, त्यानुसार २९ ऑक्टोबर २०२३ च्या अंतिम फेरीत मिसेस गटात तीन स्पर्धकांमध्ये मी विजेती ठरली आणि अन्य दोघींचा पहिला व दुसरा क्रमांक आला, असे त्या म्हणाल्या. (Preeti Dighe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.