Onion Theft : दरवाढीमुळे चोरट्यांनी मारला कांद्यावर डल्ला, पारगावात काय घडले ? वाचा सविस्तर …

कांद्याची दरवाढ आणि कांदाचोरी असा दोन्हींचा फटका शेतकऱ्यांना बसला

176
Onion Theft : दरवाढीमुळे चोरट्यांनी मारला कांद्यावर डल्ला, पारगावात काय घडले ? वाचा सविस्तर ...
Onion Theft : दरवाढीमुळे चोरट्यांनी मारला कांद्यावर डल्ला, पारगावात काय घडले ? वाचा सविस्तर ...

कांद्यांच्या दरात वाढ झाल्याने कांदा चोरीचे (Onion Theft) प्रमाण वाढल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे कांद्याची दरवाढ आणि कांदाचोरी असा दोन्हींचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

पारगाव येथील दोन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पिशव्यांमध्ये भरून ठेवलेला एकूण २५ पिशव्या कांदा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास (२८ ऑक्टोबर) घडली.

(हेही वाचा –Honeytrap : पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्या एका तरुणाला अटक )

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारगावच्या ढोबळे मळा येथे शेतकरी खंडू सादू ढोबळे यांच्या घराजवळ बरकीत साठवून ठेवलेल्या कांद्याची निवड करून बाजारात विक्रीला पाठवण्यासाठी त्यांनी १० पिशव्या कांदा भरून ठेवला होता. त्यांना या कांद्याच्या पिशव्या मंचर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवायच्या होत्या, मात्र रात्रीच्या वेळी चोरट्यांनी बराकीतील १० पिशव्या चोरून नेल्या. त्यामुळे सुमारे २५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

याच मळ्यातील शेतकरी अजित बाबाजी ढोबळे यांनी बराकीत कांदा वेचून १५ पिशव्या भरून ठेवल्या होत्या. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी त्याही पिशव्या चोरून नेल्या. यामुळे शेतकऱ्यांचे ३० हजार रुपयांचे नुकसाना झाले. पारगाव पोलीस ठाण्यात या दोन शेतकऱ्यांनी चोरीची तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास पारगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.