Vande Bharat: वंदे भारत नॉन एसी ट्रेनच्या ५ मार्गांना मंजुरी, यादी पहा…

सध्या महाराष्ट्रात ३४ वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत.

134
Vande Bharat: वंदे भारत नॉन एसी ट्रेनच्या ५ मार्गांना मंजुरी, यादी पहा...
Vande Bharat: वंदे भारत नॉन एसी ट्रेनच्या ५ मार्गांना मंजुरी, यादी पहा...

वंदे भारत ट्रेन साधारण एक्सप्रेस ट्रेन (नॉन एसी व्हर्जन) (Vande Bharat Non AC Version) प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. नवीन वंदे भारत साधारण एक्सप्रेसची सध्या चाचणी सुरू आहे. लवकरच या ट्रेनचे लोकार्पण होणार आहे. वंदे भारत ट्रेनला मोठी लोकप्रियता मिळाल असली तर तिकीट दरांमुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी त्याच दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह कमी किमतीत प्रवास करण्यासाठी ‘वंदे भारत साधारण एक्सप्रेस’ तयार करण्यात आली आहे.

वंदे भारत ट्रेनच्या ५ मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबईचाही समावेश आहे. मध्य रेल्वेच्या वाडी बंदर यार्डमध्ये वंदे भारत साधारण ट्रेन उभी असून, कसारा घाटात चाचणी केली जाणार आहे. या ट्रेनला पुश-पुल यंत्रणा असलेली दोन इंजिन पुढे आणि मागे लावण्यात आली आहेत. या ट्रेनमध्ये १२ विनावातानुकूलित शयनयान डबे, आठ सामान्य डबे आहेत. केशरी-करड्या रंगाची रंगसंगती या नवीन ट्रेनला देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Onion Theft : दरवाढीमुळे चोरट्यांनी मारला कांद्यावर डल्ला, पारगावात काय घडले ? वाचा सविस्तर …)

दिवाळीत आणखी ९ मार्गांवर सुरू होणार…
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत साधारण एक्सप्रेसच्या ५ मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गांवर लवकरच गाड्या चालवल्या जाण्याची शक्यता आहे. यामध्ये पाटणा-नवी दिल्ली, हावडा-नवी दिल्ली, हैदराबाद-नवी दिल्ली, एर्नाकुलम-गुवाहाटी आणि मुंबई-नवी दिल्ली या मार्गांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. देशातील पहिल्या सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारतच्या धर्तीवर वंदे भारत साधारण ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस फेब्रुवारी २०१९ पासून भारतीय प्रवाशांच्या सेवेत आहे. सध्या महाराष्ट्रात ३४ वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. दिवाळीत आणखी ९ मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार असून या ट्रेनचे स्लीपर व्हर्जनही लवकरच सादर केले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.