-
ऋजुता लुकतुके
पाक क्रिकेट संघाने विश्वचषकातील सलग चार सामने गमावल्यानंतर मैदानाबाहेर पहिली विकेट पडली आहे ती निवड समितीचे प्रमुख इंझमान उल हक यांची. पण, त्यासाठी संघाची खराब कामगिरी हे एकमेव कारण नाहीए… (Inzamam – Ul – Haq Resigns)
पाकिस्तान क्रिकेट संघाला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ६ पैकी फक्त २ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे ४ गुणांसह हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे आणि जवळ जवळ त्यांचं आव्हान संपल्यात जमा आहे. संघाच्या शेवटच्या पराभवानंतर पाक निवड समितीचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इंझमान उल हक यांनी राजीनामा दिल्याची बातमी आहे. (Inzamam – Ul – Haq Resigns)
पण, या राजीनाम्याचं कारण फक्त संघाची खराब कामगिरी हे नसावं. जिओ न्यूज या पाकमधील एका वृत्त वाहिनेनं दिलेल्या माहितीनुसार, ‘इंझमाम हे याझो इंटरनॅशनल्स या एका कंपनीचे समभागधारक आहेत. ही कंपनी खेळाडूंचं मार्केटिंग करते. आणि सध्याच्या संघातील बहुतेक खेळाडू या कंपनीचे क्लायंट आहेत. अगदी बाबर आझम, महम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी हे खेळाडू सुद्धा. त्यामुळे वादाची शक्यता लक्षात घेऊन इंझमान यांनी पद सोडलं असावं.’ (Inzamam – Ul – Haq Resigns)
याझो इंटरनॅशनल्स या कंपनीचे मालक आहेत तेलहा रेहमानी आणि रेहमानी हेच संघातील खेळाडूंचे एजंटही आहेत. शिवाय पाक खेळाडूंचा सध्या मोबदल्यावरूनही वाद सुरू आहे आणि या सगळ्याचा परिणाम इंझमान यांच्या राजीनाम्यात झाला आहे. तर जिओ न्यूजने इंझमाम यांनी काही दिवसांपूर्वी पाक मीडियासाठी एक प्रसिद्धीपत्रक जारी केल्याचंही म्हटलंय. (Inzamam – Ul – Haq Resigns)
‘मी पाक बोर्डाला यापूर्वीच विनंती करून ४ किंवा ५ सदस्यीय चौकशी समिती नेमण्यास सांगितलं आहे. या समितीने चौकशी करावी आणि पाक संघात खेळाडूंची निवड नि:पक्षपातीपणे झाली आहे ना याची खात्री करून घ्यावी,’ असं या प्रसिद्धी पत्रकात इंझमान यांनी म्हटलं होतं, अशी बातमी जिओ न्यूजने दिली आहे. (Inzamam – Ul – Haq Resigns)
(हेही वाचा – Mantralaya : मंत्रालयातील प्रवेशासाठी तासनतास रांगेत)
त्यानंतर पाक बोर्डानेही ट्विट करून अशी समिती नेमल्याचं जाहीर केलं होतं. (Inzamam – Ul – Haq Resigns)
Pakistan Cricket Board (PCB) has set up a five-member fact-finding committee to investigate allegations in respect of conflict of interest reported in the media pertaining to the team selection process.
The committee will submit its report and any recommendations to the PCB…
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 30, 2023
पाक संघाला मागच्या पाच महिन्यांचा पगारही मिळालेला नाही, असं समजतंय. पण, संघाचे प्रशिक्षक ग्रँट ब्रॅडबर्न यांनी अशा सगळ्या बातम्या झटकून टाकल्या आहेत. संघ फक्त आणि फक्त विजयाचा विचार करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, इंझमाम उल हक यांनी काढलेल्या पत्रकात आपला याझो इंटरनॅशनल्स या कंपनीशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा केल्याचं जिओ न्यूजने म्हटलंय. (Inzamam – Ul – Haq Resigns)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community