Lionel Messi : लियोनेल मेस्सीला मानाचा बॅनल डोर पुरस्कार

सन २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कर्णधार लायोनेल मेस्सीला यंदाचा मानाचा बॅलन डोर या पुरस्काराने मंगळवारी गौरवण्यात आलं. हा पुरस्कार जिंकल्याची त्याची ही ८वी खेप आहे

120
Lionel Messi : लियोनेल मेस्सीला मानाचा बॅनल डोर पुरस्कार
Lionel Messi : लियोनेल मेस्सीला मानाचा बॅनल डोर पुरस्कार
  • ऋजुता लुकतुके

सन २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिनाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कर्णधार लियोनेल मेस्सीला यंदाचा मानाचा बॅलन डोर या पुरस्काराने मंगळवारी गौरवण्यात आलं. हा पुरस्कार जिंकल्याची त्याची ही ८वी खेप आहे. (Lionel Messi)

अर्जेंटिना फुटबॉल संघाचा राष्ट्रीय कर्णधार लियोनेल मेस्सीला यंदाचा बॅलन डोर हा मानाचा पुरस्कार देऊन सोमवारी संध्याकाळी गौरवण्यात आलं. फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं हा सोहळा पार पडला. बॅलन डोर हा फ्रेंच फुटबॉल नियतकालिकाकडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार आहे. वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हा पुरस्कार जिंकण्याची मेस्सीची ही आठवी खेप आहे. (Lionel Messi)

महिलांमध्ये हा पुरस्कार स्पेनला महिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या ऐताना बोनमाटीला देण्यात आलाय. (Lionel Messi)

मेस्सीला हा पुरस्कार मिळण्यामागे २०२२ च्या फिफा विश्वचषकात त्याने केलेल्या कामगिरीचा मोठा वाटा आहे. कतारमध्ये झालेल्या या स्पर्धेत मेस्सीनं अर्जेंटिना संघाचं नेतृत्व केलं आणि अंतिम फेरीतील दोन गोलसह स्पर्धेत एकूण ७ गोल केले. स्पर्धेतही तोच स्टँडआऊट खेळाडू म्हणजेच लक्षवेधी खेळाडू ठरला होता. (Lionel Messi)

मेस्सीला या पुरस्कारासाठी यंदा कायलन एमबापे आणि अर्लिंग हालाद यांची कडवी लढत मोडून काढावी लागली. (Lionel Messi)

विशेष म्हणजे लियोनेल मेस्सीसाठी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये येणं हा ही एक भावनिक क्षण होता. एक वर्षापूर्वीपर्यंत तो फ्रान्समधील ला लिगा या लीगमधील पॅरिस सेंट गोमेन्स या संघाशी करारबद्ध होता आणि विश्वचषकानंतर तो हा क्लब सोडून अमेरिकन लीग खेळण्यासाठी इंटर मियामी या क्लबकडे गेला. (Lionel Messi)

(हेही वाचा – Bank Holidays in November 2023 : नोव्हेंबर महिन्यात ‘या’ दिवशी राहणार बँका बंद)

‘गेल्या वर्षभरात माझ्या अर्जेंटिना संघाने ज्या गोष्टी साध्य केल्या, त्यासाठी आम्हा सगळ्यांना मिळालेलं हे बक्षीस आहे,’ या शब्दात मेस्सीने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू, ज्याचं गेल्यावर्षी निधन झालं होतं, त्या दिएगो मॅराडोनाला मेस्सीने हा चषक समर्पितही केला. (Lionel Messi)

‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, मॅराडोना. हे तुझ्यासाठी आहे,’ असं मेस्सी चषक उंचावत म्हणाला. (Lionel Messi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.