Israel-Hamas conflict: पॅलेस्टिनी समर्थकाने नोंदवला विचित्र पद्धतीने निषेध, सोशल मिडियावर धक्कादायक व्हिडियो व्हायरल

इस्रायलचा निषेध करण्यासाठी मॅकडोनाल्डची निवड का केली?

218
Israel-Hamas conflict: पॅलेस्टिनी समर्थकाने नोंदवला विचित्र पद्धतीने निषेध, सोशल मिडियावर धक्कादायक व्हिडियो व्हायरल
Israel-Hamas conflict: पॅलेस्टिनी समर्थकाने नोंदवला विचित्र पद्धतीने निषेध, सोशल मिडियावर धक्कादायक व्हिडियो व्हायरल

इस्त्रायल-हमास यांच्यात सध्या विनाशकारी युद्ध (Israel-Hamas conflict) सुरू आहे. या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी समर्थक तऱ्हेतऱ्हेच्या युक्त्या शोधत असल्याचे सोशल मिडियावरील Xवर (पूर्वीचे ट्विटर) व्हायरल झाले आहे. एका पॅलेस्टिनी समर्थकाने इस्त्रायलला ज्या पद्धतीने विरोध केला ते पाहून लोकांना धक्का बसला आहे.

बर्मिंगहॅममधील मॅकडोनाल्ड आउटलेटचा आहे. या व्हिडियोमध्ये एका व्यक्तीने डोक्यावर पॅलेस्टिनी ध्वज घेतला आहे. तो कारच्या ट्रंकमधून प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवलेले डझनभर लाल, हिरवे, पांढरे आणि काळे असे एकूण १०० उंदिर बाहेर काढून मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये सोडतो. अचानक एवढे उंदिर पाहून आऊटलेटमधले असलेल्या ग्राहकांची घाबरगुंडी उडून ते इकडेतिकडे सैरावैरा धावत आहेत. या व्हिडियोमध्ये त्या व्यक्तिने बनावट नंबर प्लेट धरलेली दिसते. या नंबर प्लेटवर PAISTN आणि Free Palestine असे लिहिले होते. गाडीकडे जाताना हा माणूस सारखा फ्री पॅलेस्टाइनच्या घोषणा देत असल्याचेही व्हिडियोमध्ये ऐकू येत असून इस्रायलवर बहिष्कार घाला, असेही तो म्हणत आहे.

(हेही वाचा – Crude Oil Import : भारत आता रशियापाठोपाठ व्हेनेझुएलाकडून करणार तेल आयात)

मॅकडोनल्डची निवड का ?
इस्रायलचा निषेध करण्यासाठी मॅकडोनल्डची निवड का केली? याचे कारण असे सांगितले जात आहे की, मॅकडोनाल्डने अलीकडेच युद्धादरम्यान इस्रायली सैनिकांना मोफत फूड देण्याची घोषणा केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.