Apple Momento : दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला ॲपल कंपनीने दिला अनोखा मोमेंटो

ॲपल कंपनीचा एक कर्मचारी मार्कोस अलोन्सोला कंपनीत १० वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने ॲपलने त्याला जो मोमेंटो दिलाय तो सध्या चर्चेत आहे आणि अलोन्सोचा अनबॉक्सिंगचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झालाय

215
Apple Momento : दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला ॲपल कंपनीने दिला अनोखा मोमेंटो
Apple Momento : दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला ॲपल कंपनीने दिला अनोखा मोमेंटो
  • ऋजुता लुकतुके

ॲपल कंपनीचा एक कर्मचारी मार्कोस अलोन्सोला कंपनीत १० वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने ॲपलने त्याला जो मोमेंटो दिलाय तो सध्या चर्चेत आहे आणि अलोन्सोचा अनबॉक्सिंगचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झालाय. (Apple Momento)

ॲपल कंपनी जगातील अव्वल टेक कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचं अभिनव पद्धतीने उभारलेलं कार्यालय, तिथं कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सोयी-सुविधा यांची नियमितपणे चर्चा होत असते. त्याबरोबर कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याला फक्त ४० कामाचे तास आणि पगाराशिवाय मिळणारे अन्य भत्ते यामुळेही ॲपल ही कर्मचाऱ्यांची लाडकी कंपनी आहे. (Apple Momento)

याच कंपनीत मार्कोस अलोन्सो या ह्यूमन इंटरफेस डिझायनरने अलीकडे दहा वर्षं पूर्ण केली. त्या निमित्ताने त्यांना कंपनीकडून मिळालेला मोमेंटो हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. ॲल्युमिनिअमचा बनलेला हा मोमेंटो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. अलोन्सो यांनी हा मोंमेंटो अनबॉक्स करतानाचा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. (Apple Momento)

या मोमेंटोच्या मध्यभागी ॲपलचा लोगो आहे. वर १० हा आकडा ठळक अक्षरात कोरलेला आहे आणि सगळ्यात विशेष आहे तो मोमेंटोवर कंपनीचे संचालक स्टिव्ह जॉब यांनी दिलेला संदेश. (Apple Momento)

‘हा मोठा मापदंड सर केल्याबद्दल अभिनंदन. तुम्ही केलेल्या कामामुळे, वेळोवेळी स्वीकारलेल्या आव्हानांमुळे कंपनीला अवधड लक्ष्य साध्य करता आली आहेत. तुम्ही ॲपल कंपनीला दिलेल्या योगदानामुळे जगात सकारात्मक बदल झाले आहेत. आपल्या एकत्र प्रवासाबद्दल सगळ्या ॲपल कुटुंबाकडून तुम्हाला शुभेच्छा`’ (Apple Momento)

हा व्हीडिओ शनिवारी उशिरा म्हणजे भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे ट्विटरवर पडलाय आणि त्यानंतर आतापर्यंत ६ लाख लोकांनी तो पाहिलाय. शिवाय लोकांच्या त्यावरील प्रतिक्रियाही बघण्यासारख्या आहेत. (Apple Momento)

(हेही वाचा – Crime : चंद्रपूरमध्ये कारमधून अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक)

‘ॲपलचं बाजारात न मिळणारं सगळ्यात किमती उत्पादन,’ असं एकाने लिहिलंय. तर एकाने लिहिलंय, ‘मी १० वर्षं पूर्ण व्हायला २ महिने बाकी असताना अपरिहार्य कारणांनी कंपनी सोडली. पण, ५ वर्षं पूर्ण झाल्याचा मोमेंटो माझ्याकडे आहे. आणि त्यावर स्टिव्ह जॉब्स यांची सही आहे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे,’ (Apple Momento)

ओलोन्सो यांनी हा मोमेंटो अनबॉक्स करतानाचा व्हीडिओही टाकला आहे. (Apple Momento)

या मोमेंटोची विशेषता म्हणजे काही आयफोन मॉडेल्स प्रमाणेच हा मोमेंटोही १०० टक्के रिसायकल्ड वस्तूंपासून बनवण्यात आला आहे. ॲपल कंपनीची ही खासियत आहे. आणि अशी उत्पादनं बनवण्यावर ते संशोधनही करतात. (Apple Momento)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.