विशेष प्रतिनिधी, मुंबई
केईएम रुग्णालयात रुग्णांवरील वैद्यकीय उपचारासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांसह वैद्यकीय उपकरणे व साहित्यांचा साठा करून त्याचे वितरण करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आता स्वयंचलित व्यवस्थापन प्रणाली विकसित केली जात आहे. (KEM) जेणेकरून या रुग्णालयातील स्टोअर्समध्ये औषध आणि वैद्यकीय साहित्यांचा साठा करून त्याचे वितरण करतांना अचूक नोंदी ठेवल्या जाणार आहे. ज्यामुळे औषधांचा साठा, तसेच साहित्यांचा वापर किती झाला आहे आणि किती औषधे शिल्लक आहेत, तसेच साहित्याचा वापर कोणी केला आहे, याचीही अचूक माहिती या प्रणालीद्वारे मिळणार नाही. त्यामुळे आजवर अशा प्रकारच्या साठा आणि वापराच्या पद्धतीत विलंब करणाऱ्या प्रशासनाला आता या स्वयंचलित पद्धतीचा वापर केल्यामुळे कामांत पारदर्शकता येईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (KEM)
(हेही वाचा – Triumph Scrambler 400 X : ट्रायंफची ही कूल एँड केपेबल बाईक पाहिलीत का?)
महानगरपालिकेच्या रा.ए. स्मा. रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयांमध्ये रुग्णांना लागणारे विविध औषधी व वैद्यकीय साहित्य दररोज खरेदी केले जाते, साठवले जाते आणि वापरले जाते. (KEM) या विविध औषधी व वैद्यकीय साहित्याच्या व्यवस्थापन व हाताळणीसाठी या रुग्णालयात वैद्यकीय स्टोअर्स विभाग आणि सामान्य स्टोअर्स विभाग आहेत. वैद्यकीय साहित्य व औषधांच्या व्यवस्थापनामध्ये हे स्टोअर्स विभाग गुंतलेले असतात. येथील स्टोअर्स विभागामध्ये साठवण करण्यासाठी मर्यादित जागा आहे. तसेच मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे या विभागांना औषधी व वैद्यकीय साहित्य हाताळण्यास, तसेच व्यवस्थापन करण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे साहित्य व्यवस्थापन प्रणाली ही एक प्रगत आणि स्वयंचलित प्रणाली असून बऱ्याच औषोधोत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये औषधी साठवण व्यवस्थापनासाठी या प्रणालीचा वापर केला जातो. ही प्रणाली उपलब्ध जागेत, जास्तीतजास्त संभाव्य वस्तूंची पद्धतशीरपणे आणि कार्यक्षमतेने व्यवस्थापन करते. (KEM)
केईएम रुग्णालयामध्ये स्टोअर्स विभागावर असलेला ताण कमी करण्यासाठी आणि औषधी व वैद्यकीय साहित्याचे हाताळणी व व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी रुग्णालयांत स्वयंचलित साहित्य व्यवस्थापन प्रणालीची उभारणी करून त्याचा वापर करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून या प्रणालीच्या उभारणीकरता एक वर्षांच्या हमी कालावधीनंतर ३ वर्षांच्या देखभालीच्या कंत्राट कामांसाठी विविध करांसह ६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी मॅक एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (KEM)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community