BMC : मालवणीतील ‘त्या’ जमीनदोस्त शाळेच्या बांधकामासाठी कंत्राटदार निवडला

205
BMC : मालवणीतील 'त्या' जमीनदोस्त शाळेच्या बांधकामासाठी कंत्राटदार निवडला
BMC : मालवणीतील 'त्या' जमीनदोस्त शाळेच्या बांधकामासाठी कंत्राटदार निवडला

विशेष प्रतिनिधी, मुंबई

मालाड पश्चिम येथील मालवणीतील इंग्रजी व उर्दू क्र.३ महानगरपालिका शालेय इमारतीचे बांधकाम धोकादायक बनल्याने सन २०१८ मध्ये जमीनदोस्त करण्यात आले. (BMC) त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आसपासच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले; परंतु ही शालेय इमारत धोकादायक बनल्याने जमीनदोस्त केल्यांनतर नवीन बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठीच महापालिका प्रशासनाने पाच वर्षांचा कालावधी घेतला आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर नेमलेल्या कंत्राटदाराकडून पुढील तीन ते चार वर्षांमध्ये या शाळेचे बांधकाम केले जाणार असल्याने प्रत्यक्षात या शाळेत शिकणाऱ्या अनेक मुलांना शिक्षणासाठी फरफट होत आहे.

(हेही वाचा – Dadar Shivaji Park : शिवाजी महाराज पार्कवर बसवणार स्मॉग टॉवर, सुशोभीकरणासाठी विशेष प्रकल्प घेणार हाती)

मालाड पश्चिम येथील मालवणीतील इंग्रजी व उर्दू क्रमांक ३ ही महापालिकेची तळमजला अधिक दोन मजल्याची शालेय इमारत होती. या शालेय इमारतीचे बांधकाम ३७ वर्षांपेक्षा जुने झाल्याने या शाळेची दुरुस्तीसाठी नियुक्त केलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने याचे स्ट्रक्चरल ऑडीट केल्यानंतर या शालेय इमारतीचे बांधकाम हे सी वन श्रेणी अर्थात अतिधोकादायक म्हणून जाहीर केले. त्यामुळे हे बांधकाम सन २०१८मध्ये पाडण्यात आले. त्यामुळे या शालेय इमारतीत शिकणा-या विद्यार्थ्यांचे स्थलांतर शिक्षण विभागाकडून जवळच्या महानगरपालिका शाळेत करण्यात आले; परंतु या परिसरातील लोकसंख्या लक्षात घेवून शिक्षण विभागाकडून या शालेय इमारतीच्या पुर्नबांधणीचा निर्णय घेतला.

या शालेय इमारतीच्या पुनर्विकासात तळ अधिक सहा मजल्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये तळ मजल्यावर सभागृह, प्रशासकीय कार्यालय, बालवाडी, जेवणाची खोली, विद्युत मीटर, शौचालय, वाहनतळ आदींचा समावेश असून वरील सहा मजल्यांवर प्रत्येकी दहा वर्गखोल्या आणि मुख्याध्यापकांची खोली, प्रयोगशाळा, संगणक, अभ्यासिका, कला व चित्रकला खोली, प्रयोगशाळा खोली आणि मुला-मुलींकरता शौचालय आदींचे बांधकाम करण्याचा आराखडा तयार केला. यासाठी मागवलेल्या निविदेत विविध करांसह ३५ कोटी ८५ लाख रुपये खर्च केला जाणार असून या कामांसाठी तिरुपती कस्ट्रक्शन कॉर्पोरेशन कंपनीची निवड करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.