Alfred Wegener : खंडीय प्रवाहाचा सिद्धांत मांडणारे जर्मन हवामानशास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगेनर

621
Alfred Wegener : खंडीय प्रवाहाचा सिद्धांत मांडणारे जर्मन हवामानशास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगेनर
Alfred Wegener : खंडीय प्रवाहाचा सिद्धांत मांडणारे जर्मन हवामानशास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगेनर

अल्फ्रेड लोथार वेगेनर यांचा जन्म जर्मनीच्या बर्लिनमध्ये १ नोव्हेंबर १८८० रोजी झाला. (Alfred Wegener) वेगेनर एक जर्मन हवामानशास्त्रज्ञ आणि भूभौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी खंडीय प्रवाहाचा पहिला सिद्धांत विकसित केला आणि पेंजिया म्हणून ओळखला जाणारा एक महाखंड लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असल्याची कल्पना त्यांनी मांडली. ज्यावेळी त्यांनी या संकल्पना मांडल्या, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. परंतु आज शास्त्रज्ञ देखील त्यांचा गौरव करतात. (Alfred Wegener)

वेगेनर लहान असताना त्यांचे वडील एक अनाथाश्रम चालवत होते. वेगेनर यांना भौतिक आणि पृथ्वी विज्ञानात रस होता. पुढे त्यांनी जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोन्ही विद्यापीठांमध्ये या विषयांचा अभ्यास केला. १९०५ मध्ये बर्लिन विद्यापीठातून खगोलशास्त्रात त्यांनी पी.एच.डी. प्राप्त केली व पदवीधर शिक्षणही घेतले. बर्लिन येथील युरेनिया वेधशाळेत त्यांनी काही काळ सहाय्यक म्हणूनही काम केले. (Alfred Wegener)

(हेही वाचा – Sunil Tatkare : आता राजकारण करायची ही वेळ नाही, विरोधकांना सुनावले खडे बोल)

पीएचडी प्राप्त केल्यानंतर त्यांनी जर्मनीतील मारबर्ग विद्यापीठात शिकवण्यास सुरुवात केली आणि १९१० मध्ये त्यांनी “वायुमंडलाचे थर्मोडायनामिक्स” चा मसुदा तयार केला. याचे रूपांतर नंतर एका महत्त्वपूर्ण हवामानशास्त्रीय पाठ्यपुस्तकात झाले. विद्यापीठात असताना वेगेनर पृथ्वीच्या खंडांच्या प्राचीन इतिहासाकडे आणि स्थानाकडे वळले.

१९१० मध्ये त्यांनी निरीक्षण केले की, दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा आणि आफ्रिकेचा वायव्य किनारा यांच्याकडे पाहून असे वाटत होते की, जणू ते एकमेकांशी जोडले गेले होते. १९११ मध्ये वेगेनर यांना अनेक वैज्ञानिक दस्तऐवज देखील सापडले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, यातील प्रत्येक खंडावर वनस्पती आणि प्राण्यांचे समान जीवाश्म आहेत. त्यांनी १९१२ मध्ये अशी संकल्पना मांडली की, पृथ्वीचे सर्व खंड एकेकाळी एका मोठ्या महाखंडात जोडलेले होते. (Alfred Wegener)

१९१४ मध्ये ते पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मन सैन्यात भरती झाले. नंतर १९१५ मध्ये “द ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशियन्स” हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध सिद्धांत प्रकाशित केला. त्यांनी पृथ्वीचे सर्व खंड एकदा जोडलेले होते या दाव्याचे समर्थन करण्यासाठी विस्तृत पुरावे सादर केले. पण पुरावे असूनही बहुतेक वैज्ञानिक समुदायाने त्यावेळी त्यांच्या कल्पनांकडे दुर्लक्ष केले. मात्र आज वेगेनर यांचा गौरव केला जातो. (Alfred Wegener)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.